EPFO चा हा नियम जाणून घ्या नाहीतर होऊ शकतो नुकसान. PF Provident Fund 

Pf provident fund September :- जर तुम्ही रिटायर होत असाल आणि EPFO चे सदस्य असाल, तर ही महत्वाची माहिती नक्की वाचा. रिटायरमेंटनंतर तुमच्या PF खात्यावर तीन वर्षांपर्यंत व्याज मिळते. मात्र त्यानंतर खाते निष्क्रिय होते आणि व्याज मिळणे थांबते.

कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) च्या नियमानुसार, निवृत्ती घेतल्यानंतर PF खात्यावर तीन वर्षांपर्यंत व्याज मिळतं. उदाहरणार्थ, जर तुम्ही 58 व्या वर्षी निवृत्त झाला असाल, तर 61 व्या वर्षापर्यंत तुमच्या खात्यावर व्याज मिळेल. त्यानंतर खाते निष्क्रिय (Inactive) मानले जाईल आणि व्याज जमा होणार नाही.

PF खाते होईल निष्क्रिय.

काही लोकांच्या मनात शंका असते की खाते निष्क्रिय झाल्यावर पैसे बुडतील का? पण तसं अजिबात नाही. तुमचे पैसे पूर्ण सुरक्षित राहतात, फक्त व्याज थांबतं. म्हणजेच, निवृत्तीनंतर जर तुम्ही तीन वर्षांत PF रक्कम काढली नाही, तर मूळ रक्कम तर राहील पण त्यावर व्याज मिळणार नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला आहे की तीन वर्षांच्या आत PF रक्कम काढून ती दुसरीकडे गुंतवा, म्हणजे व्याजाचा फायदा सुरू राहील.Pf provident fund September

नोकरी सोडल्यानंतरही तीन वर्षे मिळेल व्याज

हेच नियम नोकरी सोडल्यावरही लागू होतात. तुम्ही शेवटच्या कंपनीतून जेवढं PF जमा केलं आहे त्यावर सरकार तीन वर्षे व्याज देते. त्यानंतर खाते निष्क्रिय होईल. आर्थिक वर्ष 2024-25 साठी EPFO ने 8.25 टक्के व्याजदर ठरवला आहे. हा दर वेळोवेळी बदलत असतो. त्यामुळे नोकरी सोडल्यानंतरही PF मध्ये व्याज किती काळ मिळेल याची माहिती ठेवणे आवश्यक PF

PF काढणे आता झाले सोपे

EPFO ने PF काढण्याचे नियम आधीपेक्षा सोपे केले आहेत. जर तुमचा UAN सक्रिय असेल आणि KYC पूर्ण असेल, तर घरबसल्या ऑनलाइन PF काढता येतो. यासाठी EPFO च्या वेबसाईटवर लॉगिन करून Online Services → Claim विभागात जाऊन अर्ज करता येतो. बँक तपशील वेरिफाय करून आणि कारण निवडून OTP द्वारे कन्फर्म केल्यावर साधारण ७-८ दिवसांत पैसे थेट बँक खात्यात जमा होतात.Pf provident fund September

जर ऑफलाइन अर्ज करायचा असेल, तर जवळच्या EPFO कार्यालयात फॉर्म-19, 10C किंवा 31 भरावा लागतो. त्यासोबत ओळखपत्र व बँक पासबुकची प्रत द्यावी लागते. काही वेळा कंपनीकडून साइन-स्टॅम्प घ्यावा लागतो. अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ७ ते १० दिवसांत पैसे मिळतात.

Leave a Comment