Close Visit Mhshetkari

आता PF रक्कम UPI व ATM द्वारे थेट काढता येणार; EPFO 3.0 अंतर्गत मोठा बदल. PF Provident Fund.

आता PF रक्कम UPI व ATM द्वारे थेट काढता येणार; EPFO 3.0 अंतर्गत मोठा बदल. PF Provident Fund.

नवी दिल्ली | 11 ऑगस्ट २०२५ – कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) आपल्या सेवांमध्ये मोठा बदल करत EPFO 3.0 अंतर्गत एक नवी सुविधा जाहीर केली आहे. या नवीन योजनेनुसार, EPF सदस्य आता आपली PF रक्कम थेट UPI किंवा ATM द्वारे काढू शकणार आहेत. हा बदल जून २०२५ पासून टप्प्याटप्प्याने लागू करण्यात येणार आहे.

🔴 कशामुळे आहे ही सुविधा महत्त्वाची? PF Provident Fund.

EPFO कडून मिळालेल्या माहितीनुसार, यामागचा मुख्य उद्देश म्हणजे कर्मचाऱ्यांना त्यांच्या मेहनतीच्या पैशासाठी महिनों‑महिने वाट पाहावी लागू नये. आतापर्यंत ऑनलाइन क्लेम केल्यानंतर पैसे येण्यासाठी ७–१० दिवस लागायचे. पण आता, आपत्कालीन गरजेच्या वेळी UPI किंवा ATM वापरून लगेचच PF मधून पैसे मिळू शकणार आहेत.

🏦 PF रक्कम ATM मधून कशी काढणार? PF Provident Fund.

EPFO लवकरच एक विशेष ATM सेवा सुरू करत आहे, जिथे UAN आणि KYC लिंक झालेल्या खात्यांवरून रक्कम UPI अथवा कार्डद्वारे काढता येणार आहे. यासाठी EPFO विविध बँकांसोबत करार करत असून, काही ठिकाणी विशेष EPFO ATM Kiosks बसवण्यात येणार आहेत.

💸 किती रक्कम काढता येणार?

  • सुरुवातीला सदस्यांना ₹१ लाख पर्यंतची रक्कम UPI/ATM द्वारे काढता येणार आहे.
  • यापुढील काही महिन्यांत ही मर्यादा वाढवण्याची शक्यता आहे.

या विभागातील 80% कर्मचाऱ्यांना सप्टेंबरपासून पगारवाढ, तरीही 12 हजार कर्मचाऱ्यांची कपात. Employees Payment 

⚡ ऑटो-सेटलमेंटची मर्यादा वाढली.

नवीन EPFO प्रणाली अंतर्गत आता ₹५ लाखापर्यंतचे क्लेम ऑटोमॅटिक मंजूर केले जातील. पूर्वी ही मर्यादा ₹१ लाख होती. या सुविधेमुळे मेडिकल, गृहखरेदी, शिक्षण व विवाह यांसारख्या गरजांसाठीचा खर्च सहज पूर्ण होऊ शकतो.

📉 प्रक्रिया आणखी सुलभ. PF Provident Fund.

EPFO ने आपली क्लेम प्रक्रिया सुलभ करताना वेरिफिकेशनचे घटक २७ वरून १८ पर्यंत कमी केले आहेत. यामुळे क्लेम मंजुरीसाठीची वेळ लक्षणीय घटली आहे.

📋 हे असणे आवश्यक:

PF रक्कम UPI किंवा ATM द्वारे काढण्यासाठी खालील गोष्टी अपडेट असणे गरजेचे आहे:

  1. UAN क्रमांक.
  2. आधार कार्ड लिंक.
  3. बँक खाते आणि PAN लिंकिंग (KYC)
  4. EPFO पोर्टलवर प्रोफाईल अपडेट
📢 अधिकृत घोषणा लवकरच PF Provident Fund.

EPFO कडून लवकरच याबाबत अधिकृत मार्गदर्शक सूचना जाहीर होणार आहेत. देशभरातील EPF धारकांसाठी ही एक मोठी दिलासा देणारी बातमी मानली जात आहे.

दर महिन्याला हमखास उत्पन्न! पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेचे संपूर्ण तपशील. Post Office Scheme

Leave a Comment