महाराष्ट्रात या वाहनधारकांना टोलमाफीचा मोठा लाभ मिळणार, जाणुन घ्या.Maharashtra Toll free News

महाराष्ट्रात या वाहनधारकांना टोलमाफीचा मोठा लाभ मिळणार, जाणुन घ्या.Maharashtra Toll free News

Maharashtra Toll free News  : नमस्कार मित्रानो : महाराष्ट्रातील इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने ‘महाराष्ट्र इलेक्ट्रिक व्हेईकल पॉलिसी २०२५’ अंतर्गत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यानुसार राज्यातील निवडक प्रमुख महामार्गांवर इलेक्ट्रिक वाहनांना १००% टोलमाफी दिली जाणार आहे.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, या निर्णयामुळे राज्यात इलेक्ट्रिक गाड्यांचा वापर वाढेल आणि पर्यावरण संरक्षणालाही मोठी मदत होईल.

टोलमाफी कुठे लागू होणार? Maharashtra Toll free News

  1. सरकारने ही सुविधा सध्या प्रमुख तीन महामार्गांवर लागू केली आहे –
  2. मुंबई-पुणे यशवंतराव चव्हण महामार्ग.
  3. अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतु.
  4. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग

या मार्गांवर प्रवास करणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांना कोणताही टोल भरावा लागणार नाही. इतर राज्य व राष्ट्रीय महामार्गांवर मात्र EV धारकांना ५०% टोलसवलत मिळेल.

कोणत्या गाड्यांना लाभ? Maharashtra Toll free News

ही योजना फक्त विशिष्ट श्रेणीतील वाहनांसाठीच आहे.

M2, M3 आणि M6 श्रेणीतील चारचाकी इलेक्ट्रिक गाड्या (उदा. टाटा नेक्सॉन EV, MG ZS EV, महिंद्रा XUV400)

इलेक्ट्रिक बसेस – राज्य परिवहन महामंडळ (ST) आणि खासगी कंपन्यांच्या बसेस

महत्त्वाचे म्हणजे, ही सर्व वाहने महाराष्ट्रात नोंदणीकृत आणि पूर्णपणे इलेक्ट्रिक असणे आवश्यक आहे.

सरकारचे उद्दिष्ट. Maharashtra Toll free News

  1. या निर्णयामागचा मुख्य हेतू म्हणजे –
  2. पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना देणे.
  3. पेट्रोल-डिझेलवरील अवलंबित्व कमी करणे.
  4. नागरिकांचा प्रवास खर्च कमी करणे.

सरकारने या योजनेसाठी तब्बल १,९९३ कोटी रुपये निधी मंजूर केला आहे आणि ही पॉलिसी २०३० पर्यंत लागू राहणार आहे.

इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी डबल फायदा. Maharashtra Toll free News

आधीच EV वापरकर्त्यांचा पेट्रोल-डिझेलवरील खर्च वाचतो, त्यातच आता टोलमाफीमुळे त्यांची आणखी बचत होणार आहे. म्हणजेच इलेक्ट्रिक गाडीधारकांना आता दुप्पट फायदा मिळणार आहे.

 

Leave a Comment