राज्य कर्मचाऱ्यांसाठी 02 जानेवारी 2026 चे 4 महत्त्वाचे शासन निर्णय (GR) जाहीर.
मुंबई | दि 04 जानेवारी 2026
Maharashtra Government GR 2026 : राज्य शासनाने दिनांक 02 जानेवारी 2026 रोजी राज्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संदर्भात चार महत्त्वाचे शासन निर्णय (GR) जाहीर केले आहेत. या निर्णयांचा थेट परिणाम विविध विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर होणार असून, पदोन्नती, ज्येष्ठतासूची, निवृत्तीवेतन योजना आणि भरती प्रक्रियेशी संबंधित महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. या सर्व निर्णयांची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे –
1) स्थानापन्न पदोन्नतीबाबत महत्त्वाचा निर्णय. Maharashtra Government GR 2026
भारतीय वन सेवेतील (Indian Forest Service) अधिकाऱ्यांना
निवडश्रेणीत स्थानापन्न पदोन्नती (In-situ Promotion) देण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे.
- हा निर्णय महसूल व वन विभागामार्फत जाहीर करण्यात आला आहे.
- निर्णयाची अंमलबजावणी 01 जानेवारी 2026 पासून लागू होणार आहे.
- यामुळे पात्र अधिकाऱ्यांना आर्थिक व पदसंबंधित लाभ मिळणार आहेत.
2) सार्वजनिक बांधकाम विभाग – तात्पुरती ज्येष्ठतासूची जाहीर
सार्वजनिक बांधकाम विभागातील
कनिष्ठ अभियंता (विद्युत) – Junior Engineer (Electrical) या संवर्गाची
- 01 जानेवारी 2026 रोजीची तात्पुरती ज्येष्ठतासूची प्रसिद्ध करण्यात आली आहे.
- संबंधित अधिकाऱ्यांनी ही यादी काळजीपूर्वक तपासावी.
- हरकती किंवा सूचना असल्यास निर्धारित कालावधीत सादर करण्याचे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.
3) NPS मधून UPS मध्ये स्थलांतराबाबत निर्णय
राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (NPS) मधून
एकीकृत निवृत्तीवेतन योजना (UPS) मध्ये स्थलांतर केलेल्या
- अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या मासिक अंशदानाची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे.
- यास सामान्य प्रशासन विभागाने (GAD) शासन मान्यता दिली आहे.
- या निर्णयामुळे निवृत्तीवेतन प्रक्रियेत स्पष्टता येणार असून अधिकाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
4) सहकार विभाग – पदनाम बदल व भरती प्रक्रियेला मंजुरी.
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील
- “सांख्यिकी अधिकारी” हे पदनाम बदलून
आता “Software Support Engineer” असे करण्यात आले आहे. - हे पद बाह्यस्त्रोताद्वारे कंत्राटी पद्धतीने किंवा
महाआयटी (MahaIT) मार्फत भरण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. - यामुळे तांत्रिक कामकाज अधिक प्रभावी होण्यास मदत होणार आहे.





