LIC ची नवी पॉलिसी : आता हॉस्पिटलच्या बिलांची चिंता संपली. LIC New Policy
नवी दिल्ली | प्रतिनिधी – LIC New Policy आजारपण आणि अपघातामुळे अचानक वाढणाऱ्या हॉस्पिटल बिलांमुळे सर्वसामान्य कुटुंबाचे आर्थिक गणित बिघडते. यावर तोडगा म्हणून भारतीय जीवन विमा निगमने (LIC) ‘जीवन आरोग्य विमा पॉलिसी’ उपलब्ध करून दिली आहे. या पॉलिसीमुळे रुग्णालयातील खर्च मोठ्या प्रमाणात कव्हर होणार असल्याने कुटुंबाला दिलासा मिळणार आहे.
काय मिळणार या पॉलिसीत? LIC New Policy
- हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यास खर्चाचा ५०% दावा तत्काळ मंजूर.
- एम्बुलन्स खर्च ₹१,००० पर्यंत कव्हर.
- हॉस्पिटलमध्ये दिवसाला ₹१,००० ते ₹४,००० पर्यंत आर्थिक मदत.
- आयसीयू साठी दिवसाला ₹८,००० पर्यंत कव्हर, ३६० दिवसांसाठी.
- ही सुविधा वर्षात ५ वेळा घेता येऊ शकते.
प्रीमियम किती भरावा लागणार? LIC New Policy
- वय २० वर्षे – ₹१,९२२ वार्षिक.
- वय ३० वर्षे – ₹२,२४३ वार्षिक.
- वय ४० वर्षे – ₹२,७९९ वार्षिक.
- वय ५० वर्षे – ₹३,७६८ वार्षिक
वयानुसार प्रीमियम वाढत जातो, पण त्याबदल्यात संपूर्ण कुटुंबाला आरोग्य खर्चापासून संरक्षण मिळते.
कुटुंबालाही संरक्षण. LIC New Policy
या पॉलिसीचा लाभ पती-पत्नी, मुले, आई-वडील तसेच सासू-सासरे यांनाही मिळणार आहे. त्यामुळे एखाद्या सदस्याला हॉस्पिटलायझेशनची गरज भासल्यास संपूर्ण कुटुंब आर्थिक दृष्ट्या सुरक्षित राहील.