नोकरदारांसाठी खुशखबर! नवीन कामगार संहितेमुळे पगाराचा हिशोब बदलणार.Labour Code Salary Change
Labour Code Salary Change : भारतामधील नोकरी करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून मोठा दिलासा मिळणार आहे. पगार, भत्ते, पीएफ (PF) आणि ग्रॅच्युइटी (Gratuity) याबाबत अनेक वर्षांपासून असलेला संभ्रम आता दूर होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने मंजूर केलेल्या नवीन कामगार संहिता (New Labour Code) अंतर्गत कामगार मंत्रालयाने मसुदा नियम आणि त्यावर आधारित प्रश्नोत्तरे जाहीर केली आहेत. त्यामुळे भविष्यात पगार कसा ठरवला जाईल आणि सामाजिक सुरक्षा कशी मिळेल, याबाबत स्पष्टता आली आहे.
वेतन रचनेत काय बदल होणार? Labour Code Salary Change
नवीन कामगार संहितेमुळे देशभरात वेतनाची एकसमान व्याख्या लागू केली जाणार आहे. आतापर्यंत वेगवेगळ्या कायद्यांनुसार वेतनाची व्याख्या वेगवेगळी होती. आता मूळ वेतन, महागाई भत्ता आणि रिटेनिंग अलाउन्स यांचा समावेश वेतनात केला जाईल. या संहितेतील सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे ५० टक्के नियम. या नियमानुसार कर्मचाऱ्याच्या एकूण पगारामधील भत्त्यांचा वाटा ५० टक्क्यांपेक्षा जास्त असू शकणार नाही. जर मूळ पगार कमी ठेवून भत्ते जास्त दाखवले असतील, तर जादा भत्त्यांची रक्कम वेतनात जोडली जाईल. याचा थेट फायदा पीएफ आणि ग्रॅच्युइटीच्या गणनेत होणार आहे.
PF आणि Gratuity वर काय परिणाम होईल? Labour Code Salary Change
आतापर्यंत अनेक कंपन्या पीएफ आणि ग्रॅच्युइटीचा खर्च कमी करण्यासाठी मूळ पगार कमी ठेवत होत्या. नवीन नियमांमुळे हे शक्य होणार नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा पीएफ जास्त रकमेवर कापला जाईल आणि निवृत्तीनंतर मिळणारी ग्रॅच्युइटीही वाढण्याची शक्यता आहे. मात्र कामगिरीवर आधारित बोनस, बदलता पगार, ESOP तसेच प्रवास किंवा इतर खर्चाची परतफेड वेतनाचा भाग मानली जाणार नाही.
ग्रॅच्युइटीच्या नियमांमध्येही महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे.
आता ग्रॅच्युइटीची गणना फक्त मूळ पगारावर न होता, शेवटच्या मिळालेल्या वेतनावर केली जाईल. हे नियम 21 नोव्हेंबर 2025 पासून लागू झाले आहेत . त्यानंतर नोकरी सोडणारे किंवा निवृत्त होणारे कर्मचारीच या बदलाचा लाभ घेऊ शकतील. विशेष म्हणजे निश्चित मुदतीच्या करारावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता फक्त एक वर्षाची सेवा पूर्ण केल्यानंतरही ग्रॅच्युइटी मिळू शकणार आहे





