EPFO कडून मोठी दिलासादायक घोषणा; मृत्यू राहत निधीची रक्कम वाढवून ₹15 लाख. EPFO death relief fund

EPFO कडून मोठी दिलासादायक घोषणा; मृत्यू राहत निधीची रक्कम वाढवून ₹15 लाख. EPFO death relief fund

२4 ऑगस्ट २०२५

EPFO death relief fund. कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (EPFO) आपल्या केंद्रीय मंडळातील कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. मृत्यू झाल्यास मिळणाऱ्या राहत निधीची (Ex-Gratia) रक्कम आता ₹8.8 लाखांवरून थेट ₹15 लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. हा बदल १ एप्रिल २०२५ पासून लागू होणार आहे.

यासोबतच, महागाईचा विचार करून ही रक्कम १ एप्रिल २०२६ पासून दरवर्षी ५% ने वाढवली जाणार आहे. त्यामुळे भविष्यात कर्मचारी कुटुंबियांना अधिक आर्थिक संरक्षण मिळणार आहे.

प्रक्रिया अधिक सुलभ. EPFO death relief fund

अल्पवयीन मुलांच्या नावे निधी हस्तांतरित करण्यासाठी आता Guardianship Certificateची आवश्यकता नाही.

See also  राज्यातील गट अ ते ड संवर्गातील कर्मचाऱ्यांवरील शिस्तभंग कारवाईसंदर्भात नवीन शासन निर्णय. Employee misconduct action

तसेच, AADHAAR–UAN लिंकिंग प्रक्रियाही अधिक सोपी करण्यात आली आहे, ज्यामुळे कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना अडचणी कमी होतील.

रोजगारात वाढ. EPFO death relief fund

EPFO कडून जाहीर करण्यात आलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, जून २०२५ मध्ये तब्बल 21.8 लाख नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. यामध्ये 10.6 लाख नवीन सदस्य सामील झाले असून त्यापैकी सुमारे ६०% तरुण (१८–२५ वर्षे वयोगटातील) आहेत.

EPFO च्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना मोठा आर्थिक आधार मिळणार असून, भविष्यातील सुरक्षिततेत वाढ होणार आहे.

Leave a Comment