Created by Aayat, 8 जानेवारी 2025
वेतन रचना, PF, कामाचे तास आणि ग्रेच्युटी नियमांत ऐतिहासिक सुधारणा. नवीन Labour Code 2025 लागू होणार? कर्मचाऱ्यांच्या पगारापासून ग्रेच्युटीपर्यंत मोठे बदल
नमस्कार मित्रानो केंद्र सरकारच्या नवीन Labour Code 2025 मुळे खासगी आणि सरकारी क्षेत्रातील कोट्यवधी कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात मोठे बदल होणार आहेत. पगाराची रचना, PF कपात, कामाचे तास, ओव्हरटाईम, ग्रेच्युटी आणि गिग वर्कर्ससाठी सामाजिक सुरक्षा यामध्ये महत्त्वाच्या सुधारणा करण्यात आल्या आहेत.
💼 पगार रचनेत मोठा बदल. Employees New Update.
नवीन नियमांनुसार कर्मचाऱ्यांच्या एकूण पगारातील किमान 50 टक्के रक्कम Basic Salary असणे बंधनकारक करण्यात आले आहे.
यामुळे PF आणि ग्रेच्युटीची रक्कम वाढणार आहे. मात्र काही कर्मचाऱ्यांचा In-Hand Salary थोडा कमी होण्याची शक्यता आहे.
⏰ कामाचे तास आणि 4-Day Work Culture
नवीन Labour Code नुसार आठवड्यातील कामाचे एकूण तास 48 असतील.
कंपन्यांना 4 दिवस काम आणि 3 दिवस सुट्टी देण्याचा पर्याय उपलब्ध होईल.
जर कर्मचाऱ्यांकडून जादा काम करून घेतले तर Overtime साठी दुप्पट वेतन देणे बंधनकारक आहे.
💰 वेळेत पगार देणे बंधनकारक
नवीन नियमांनुसार –
मासिक पगार असलेल्या कर्मचाऱ्यांना पुढील महिन्याच्या 7 तारखेपूर्वी पगार द्यावा लागेल
नोकरी सोडल्यास किंवा काढून टाकल्यास 2 दिवसांत अंतिम देयके देणे आवश्यक
उशीर झाल्यास कंपनीवर दंडात्मक कारवाई होऊ शकते.
🧾 Salary Slip आणि Appointment Letter अनिवार्य.
प्रत्येक कर्मचाऱ्याला आता Salary Slip देणे बंधनकारक असेल.
तसेच नवीन नोकरीत रुजू होताना Appointment Letter देणे कायदेशीर बंधन करण्यात आले आहे.
यामुळे कर्मचारी आणि कंपनी यांच्यातील वाद कमी होतील.
🏦 PF आणि ESIC कव्हरेज वाढणार
नवीन Labour Code मुळे PF आणि ESIC अधिक कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे.
यामुळे आरोग्य सुविधा आणि निवृत्ती सुरक्षा अधिक मजबूत होईल.
🧑🔧 ग्रेच्युटी नियमात मोठा दिलासा
- आतापर्यंत 5 वर्षे सेवा आवश्यक असलेली ग्रेच्युटी आता –
- Fixed Term Employees
- Contract Employees
- यांनाही 1 वर्ष सेवा पूर्ण केल्यानंतर मिळू शकणार आहे.
- हा बदल लाखो कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे.
- 🚴♂️ Gig Workers साठी सामाजिक सुरक्षा.
- डिलिव्हरी बॉय, फ्रीलान्सर, प्लॅटफॉर्म वर्कर्स यांना आता –
- सामाजिक सुरक्षा.
- विमा सुविधा.
- भविष्य निर्वाह निधी.
- यांचा लाभ मिळणार आहे. कंपन्यांना Social Security Fund मध्ये योगदान द्यावे लागेल.
📉 National Floor Wage लागू
केंद्र सरकार National Floor Wage निश्चित करणार आहे.
- यामुळे कोणत्याही राज्यात ठराविक किमान वेतनापेक्षा कमी पगार देता येणार नाही.
📌 थोडक्यात काय फायदा?
- ✔ PF आणि ग्रेच्युटी वाढणार
- ✔ कामगारांचे हक्क मजबूत
- ✔ वेळेत पगाराची हमी
- ✔ गिग वर्कर्सना सुरक्षा
- ✔ कामाचे नियम स्पष्ट





