तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना व निवृत्तीवेतन संदर्भात दोन स्वतंत्र शासन निर्णय जारी. Employee today big news

Employee today big news :– महाराष्ट्र शासनाने दिनांक १६ सप्टेंबर २०२५ रोजी दोन महत्त्वाचे शासन निर्णय निर्गमित केले आहेत. हे निर्णय तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना तसेच निवृत्तीवेतन या विषयांशी संबंधित आहेत.

⭕ तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना

वित्त विभागाच्या २ मार्च २०१९ रोजीच्या शासन निर्णयानुसार, १०, २० आणि ३० वर्षांच्या नियमित सेवेनंतर अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रगती योजनेचा लाभ मिळणार आहे.

ही योजना १ जानेवारी २०१६ पासून लागू करण्यात आली आहे.

संबंधित तरतुदींनुसार, पात्र ठरणाऱ्या अधिकाऱ्यांना १०, २० आणि ३० वर्षांनंतर अनुक्रमे पहिला, दुसरा आणि तिसरा लाभ मंजूर होईल.Employee today big news

या निर्णयानुसार, विधी व न्याय विभागांतर्गत धर्मादाय संघटना आस्थापनांवरील सहायक धर्मादाय अधिकाऱ्यांना सुधारीत प्रगती योजनेचा लाभ देण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

See also  घर मालक न सांगता करू शकतो का हे काम, किरायेदार असाल तर जाणून घ्या संपूर्ण माहिती. Property rights

🔵 निवृत्तीवेतन (Old Pension Scheme)

ज्या शासकीय पदांच्या भरतीची जाहिरात/अधिसूचना १ नोव्हेंबर २००५ पूर्वी काढण्यात आली, परंतु नियुक्ती १ नोव्हेंबर २००५ नंतर झाली, अशा अधिकाऱ्यांबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

उच्च व तंत्रशिक्षण विभागाने केंद्र सरकारच्या धोरणानुसार, अशा अधिकाऱ्यांना जुनी निवृत्तीवेतन योजना (OPS) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

या योजनेचा लाभ मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांची यादी शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आली आहे.Employee today big news

🔴नागरिकांसाठी महत्त्वाची नोंद

दोन्ही शासन निर्णयांची अधिकृत प्रत (GR) शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्याचा थेट लाभ मिळणार आहे

Leave a Comment