Maharashtra GOVT Employees DA hike: महाराष्ट्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये वाढ करण्याचा सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. वास्तविक, सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी 2025 पासून वाढीव महागाई भत्ता दिला जाणार आहे. त्यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

यासंदर्भात 15 मे 2025 रोजी राज्य सरकार मार्फत नवीन शासन निर्णय परिपत्रक जारी केले आहे. त्यात कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाप्रमाणे जानेवारी 2025 पासून 2 टक्के महागाई भत्ता देण्याची य अंमलबजावणी करण्यात येणार ( Employees DA hike ) असल्याचे सांगितले गेले . जानेवारी 2025 ते – मे 2025 पर्यंतचा वाढीव महागाई भत्ता थकबाकीच्या स्वरूपात मे, देय जुन. च्या पगारामध्ये दिला जाईल असेही परिपत्रकात म्हटले आहे.

आता कर्मचाऱ्यांना 1/01/2025 पासुन 55% महागाई भत्ता देण्यात येईल 

विरोधक प्रश्न उपस्थित करत होते. Employees DA hike

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीवर मोठा बोजा पडत असल्याची चर्चा सातत्याने होत आहे. तसेच या मुद्द्यावर राज्य सरकारबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. अशा विविध योजनांमुळे राज्य सरकारची आर्थिक स्थिती कोंडीत सापडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती.

परंतु आज सरकारने महागाई भत्ता वाढीबाबत निर्णय घेतला याचा फायदा राज्य सरकारी कर्मचारी तसेच पेन्शधारकांना होणार आहे. Employees DA hike

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *