ऐकावे ते नवलंच! रेल्वे रुळावर महिलेने 7 किलोमीटर पर्यंत चालवीत नेली कार, 2 तास रेल्वे ठप्प. Car on railway tracks

ऐकावे ते नवलंच! रेल्वे रुळावर महिलेने 7 किलोमीटर पर्यंत चालवीत नेली कार, 2 तास रेल्वे ठप्प. Car on railway tracks

Insurwithme | 26 जून 2025 | हैदराबाद:

Car on railway tracks : तेलंगणामधील नागूलपल्ली आणि शंकरपल्ली दरम्यानच्या रेल्वे मार्गावर एका महिलेने  कार चालवत नेल्याने मोठी खळबळ उडाली. ही कार थेट रेल्वे रुळांवरून सुमारे 7 किलोमीटरपर्यंत गेली, परिणामी रेल्वे वाहतूक जवळपास २ तासांपर्यंत ठप्प झाली. रील्स साठी सगळा प्रकार झाल्याचे समजते.

हिंदी भाषेशी संबंधित दोन्ही जीआर मागे; नव्या त्रिभाषा सूत्रासाठी नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती. Maharashtra language policy

नेमकं काय घडलं?

प्राप्त माहितीनुसार, एका महिलेने अनवधानाने कार रेल्वे रुळावर घालून ती चालवत नेली. घटनास्थळावर उपस्थित स्थानिकांनी तात्काळ याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांना माहिती दिली. रेल्वे प्रशासनाने वेळीच लक्ष दिल्याने मोठा अपघात टळला.

  • कार नागूलपल्ली स्टेशनजवळून रुळांवर घेण्यात आली .
  • रुळांवरून कार चालवत नेण्यात आली, शंकरपल्लीपर्यंत पोहोचली.
  • स्थानिक नागरिकांनी फोन करून दिली माहिती.
  • रेल्वे प्रशासनाने वेळेत रेल्वे गाड्या थांबवल्या
See also  EPS 95 पेन्शन अपडेट 2025 — तुम्हाला ₹7,500 मासिक पेन्शन कधी मिळेल?

२ तास रेल्वे वाहतूक ठप्प. Car on railway tracks.

मोबाईलवरून मतदान सुरू! मतदारांनी केले घर बसल्या मतदान तुम्ही कधी करणार जाणुन घ्या. mobile voting in India

या प्रकारामुळे रेल्वे वाहतूक दोन तासांसाठी पूर्णपणे बंद ठेवावी लागली. काही गाड्या उशिराने धावल्या, तर काहींना मार्गावरच थांबवण्यात आले. प्रवाशांना याचा मोठा त्रास सहन करावा लागला.

पोलिस आणि रेल्वे प्रशासनाची तत्काळ कारवाई.

घटनेची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा कर्मचारी आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले. कार रुळावरून हटवण्यासाठी क्रेनच्या सहाय्याने ऑपरेशन राबवले गेले.

  1. कार हटवण्यासाठी रेल्वे तांत्रिक पथक तैनात.
  2. महिला चालकाची चौकशी सुरू.
  3. रेल्वे सुरक्षा कायद्यानुसार पुढील कारवाईची शक्यता.

अपघात टळला, पण धोका मोठा होता. Car on railway tracks

या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र या निष्काळजीपणामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता होती. वेळेवर रेल्वे गाड्या थांबवण्यात आल्यामुळे संभाव्य धोका टळला.

See also  फिटमेंट फॅक्टर बाबत मोठी बातमी, हे कर्मचारी होणार श्रीमंत ,पगारात ही होईल बंपर वाढ, जाणून घ्या अपडेट. employees new update

रेल्वे प्रशासनाची अपील.

रेल्वे प्रशासनाने नागरिकांना रेल्वे रुळांवर वाहन घेण्यापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. अशा घटनांमुळे केवळ सार्वजनिक वाहतुकीवर परिणाम होतोच, पण जीवितहानीचीही शक्यता असते.

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील १९ वाहनांत इंधनाऐवजी पाणी भरल्याची धक्कादायक घटना, पेट्रोल पंप सील. Fuel fraud in government convoy

Leave a Comment