Close Visit Mhshetkari

राज्यातील या कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन, महागाई भत्ता, नियमित वेतनश्रेणी ची, देयके 31 डिसेंबर पर्यंत अदा करण्यात येणार. Online Salary Arrears Submission

थकीत वेतन अदा करण्याबाबत शिक्षण संचालनालयाचा मोठा निर्णय; शालार्थ प्रणालीतून ऑनलाईन देयके सादर करण्याचे आदेश

Online Salary Arrears Submission : राज्यातील अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतन देयकांबाबत शिक्षण संचालनालयामार्फत दि. 19 नोव्हेंबर 2025 रोजी एक महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. या परिपत्रकानुसार थकीत वेतन देयके आता शालार्थ प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

शालार्थ प्रणालीत नवीन सुविधा उपलब्ध

परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे की, सन 2025-26 पासून शालार्थ प्रणालीमध्ये थकीत वेतन देयके ऑनलाईन सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे प्रलंबित असलेली सर्व थकीत देयके शालार्थ प्रणालीवरच सादर करावी लागणार आहेत.

मंजूर थकीत देयकेच अपलोड करण्याचे निर्देश

शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे की, अनुदानाची देयके योग्यरीत्या तपासून मंजूर झाल्यानंतरच थकीत वेतन देयके शालार्थ प्रणालीवर अपलोड करावीत. अपूर्ण, चुकीची अथवा कागदपत्रांशिवाय देयके सादर करू नयेत, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

थकीत देयकांची जबाबदारी मुख्याध्यापकांवर. Online Salary Arrears Submission

सदर परिपत्रकानुसार, प्रलंबित थकीत वेतन देयके भरण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांवर असणार आहे. वैयक्तिक मान्यता, वरिष्ठ वेतनश्रेणी, न्यायालयीन आदेश किंवा अनुदानाअभावी प्रलंबित राहिलेली देयके यामध्ये समाविष्ट असतील.

थकीत देयकांमध्ये खालील बाबींचा समावेश. Online Salary Arrears Submission

थकीत देयकांचे प्रकार :

1. पदोन्नती

2. वेतनवाढ

3. निवडश्रेणी

4. शिक्षण सेवक मानधन

5. महागाई भत्ता फरक

6. सहावा व सातवा वेतन आयोग फरक

7. निलंबन / बडतर्फ कालावधीतील वेतन फरक

8. न्यायालयीन प्रकरणांतील देयके

9. पवित्र प्रणालीद्वारे नियुक्त कर्मचाऱ्यांचे देयके

10. नियमित वेतनश्रेणीतील फरक

11. वरिष्ठ वेतनश्रेणी

31 डिसेंबर 2025 पर्यंत अंतिम मुदत

परिपत्रकानुसार, 01 ते 06 वर्षे तसेच 06 वर्षांपेक्षा अधिक कालावधीची थकीत देयके दि. 31 डिसेंबर 2025 पर्यंत शालार्थ प्रणालीवर सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. निर्धारित कालावधीत देयके सादर न केल्यास त्याची जबाबदारी संबंधित संस्थेवर राहणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

शिक्षकांसाठी दिलासा, प्रशासनासाठी सूचना

या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली थकीत वेतन देयके निकाली निघण्याची शक्यता निर्माण झाली असून शिक्षक व कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र, यासाठी मुख्याध्यापकांनी वेळेत आणि अचूक माहिती शालार्थ प्रणालीवर सादर करणे आवश्यक ठरणार आहे.

 

DA Maharashtra

Leave a Comment