State employe news :- महाराष्ट्र शासनाने दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी राज्यातील कर्मचाऱ्यांसंबंधी दोन महत्त्वाचे शासन निर्णय जारी केले आहेत. हे निर्णय रोजगार हमी योजना व रोजंदारी आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांच्या सेवेशी संबंधित आहेत..
⭕रोजगार हमी योजनेतील कर्मचाऱ्यांना मुदतवाढ
महसूल व वन विभागाने रोजगार हमी योजनेअंतर्गत वनीकरणासाठी कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या ९३६ अस्थायी पदांना सन २०२५-२६ या वर्षाकरिता मुदतवाढ दिली आहे.
- ही मुदतवाढ १ सप्टेंबर २०२५ ते २५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीसाठी लागू राहील.
- संबंधित कर्मचारी वनीकरण, जलसंधारण व वनतळे कामांसाठी नियुक्त करण्यात आले आहेत.
- या निर्णयामुळे वनीकरणाशी संबंधित कामांना गती मिळणार असून कर्मचाऱ्यांना दिलासा मिळेल.
🔴पाच वर्षे सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना कायम नोकरीत सामावून घेण्यास मंजुरी
रोजंदारी आस्थापनेवरील कर्मचारी जर सलग पाच वर्षे (प्रति वर्षी २४० दिवसांची सेवा) पूर्ण करत असतील, तर त्यांना रुपांतरित अस्थायी आस्थापनेवर घेण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.
या निर्णयाचा लाभ श्री. विनोद रमेश वाल्मिकी (सफाई कामगार) यांना देण्यात आला आहे.
ते ६ फेब्रुवारी २०१८ ते ५ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत नियमांनुसार सेवा पूर्ण केल्यामुळे, त्यांना ६ फेब्रुवारी २०२३ पासून सफाई कामगार या पदावर रुपांतरित अस्थायी आस्थापनेत सामावून घेण्यात आले आहे.
👉 या संदर्भातील सविस्तर GR शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.