Close Visit Mhshetkari

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी युनिफाईड पेन्शन योजनेअंतर्गत महत्त्वाचे बदल ; एक वेळ स्विचची सुविधा उपलब्ध. Unified Pension Scheme 2025

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी युनिफाईड पेन्शन योजनेअंतर्गत महत्त्वाचे बदल ; एक वेळ स्विचची सुविधा उपलब्ध. Unified Pension Scheme 2025

नवी दिल्ली | 27 ऑगस्ट 2025 –  Unified Pension Scheme 2025 : नमस्कार मित्रानो राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) अंतर्गत येणाऱ्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थ मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. 24 जानेवारी 2025 रोजी अधिसूचित केलेल्या युनिफाईड पेन्शन योजना (UPS) संदर्भात नव्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

नव्या तरतुदीनुसार, UPS चा पर्याय निवडलेल्या सर्व केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना एकदाच UPS वरून NPS मध्ये स्विच करण्याची सुविधा दिली जाणार आहे. ही सुविधा सेवानिवृत्तीच्या तारखेच्या एक वर्ष आधी अथवा स्वेच्छा निवृत्तीच्या बाबतीत निवृत्तीच्या मान्य तारखेच्या तीन महिने आधी वापरता येईल. Unified Pension Scheme 2025

See also  तुमची बचत आणखी सुरक्षित होईल! आरबीआयने ३ सर्वात सुरक्षित बँकांची यादी जाहीर केली. RBI bank new update 

जर निश्चित कालावधीत स्विच सुविधा वापरली गेली नाही, तर संबंधित कर्मचारी डीफॉल्टनुसार UPS मध्येच समाविष्ट राहतील, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

शिस्तभंगाची कारवाई असलेल्या कर्मचाऱ्यांना अपात्रता. Unified Pension Scheme 2025

सदर स्विच सुविधा शिस्तभंगाची कारवाई सुरु असलेल्या, शिक्षेसाठी काढून टाकलेले, सक्तीची निवृत्ती घेतलेले किंवा अशा प्रकरणांमध्ये गुंतलेल्या कर्मचाऱ्यांना उपलब्ध राहणार नाही.

NPS व UPS लाभांचे नियम. Unified Pension Scheme 2025

  1. स्विच केल्यानंतर कर्मचाऱ्यांना PFRDA नियमांनुसार UPS लाभ व खात्रीशीर पेमेंट लागू होणार नाही.
  2. डिफॉल्ट गुंतवणूक पद्धतीसाठी सरकारचे योगदान 4 टक्के निश्चित केले जाईल.
  3. बाहेर पडताना कर्मचाऱ्यांच्या NPS कॉर्पसमध्ये हे योगदान जमा केले जाईल.
See also  जमीन रजिस्ट्रीचे हे 8 नवीन नियम माहिती असावे,नाहीतर नुकसान होऊ शकते, जाणून घ्या अधिक माहिती. Land registry new rule

👉 एकूणच, केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना निवृत्ती नियोजनासाठी अतिरिक्त पर्याय व लवचिकता मिळणार आहे.

Leave a Comment