ST Mahamandal Scheme 2025 :- महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (MSRTC) प्रवाशांसाठी नवीन योजना सुरु केली आहे. “एसटी महामंडळ योजना 2025” अंतर्गत प्रवाशांना आता ७ दिवसांचा तसेच ४ दिवसांचा पास खरेदी करण्याची सुविधा मिळणार आहे. या योजनेत साध्या बसेस तसेच शिवशाही बसेसवर प्रवास करता येईल.

⭕पासचे दर

साध्या बसेसाठी

  • प्रौढ : ७ दिवस = ₹2040, ४ दिवस = ₹1170
  • मुले : ७ दिवस = ₹1025, ४ दिवस = ₹585

शिवशाही बसेसाठी

  1. प्रौढ : ७ दिवस = ₹3030, ४ दिवस = ₹1520
  2. मुले : ४ दिवस = ₹765

🔵महत्त्वाचे नियम

पास सर्व प्रकारच्या बसेसवर वैध राहील : साधी, जलद, रात्रीची, शहरी, यशवंत आणि शिवशाही.

प्रवासापूर्वी १० दिवस आधी पास खरेदी करता येईल.

हरवलेला पास परत मिळणार नाही.

पास हस्तांतरणीय नाही; गैरवापर आढळल्यास तो जप्त केला जाऊ शकतो.

हा पास फक्त महाराष्ट्रातील एसटी बसेससाठी वैध आहे; इतर राज्यांत लागू नाही.

या योजनेमुळे प्रवाशांना कमी दरात महाराष्ट्रभर प्रवास करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.ST Mahamandal Scheme 2025

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *