September holiday :- महाराष्ट्रात येत्या २२ सप्टेंबर रोजी घटस्थापना होणार असून नवरात्रोत्सवाची सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांमध्ये शाळा, महाविद्यालये तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
⭕कुठे मिळणार सुट्टी?
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव, पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी परिपत्रक काढत २२ सप्टेंबर रोजी शासकीय सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे संबंधित जिल्ह्यांतील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा आणि महाविद्यालये बंद राहणार आहेत.
🔵राज्यस्तरीय सुट्टी नाही
राज्य सरकारने मात्र घटस्थापनेच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रासाठी शासकीय सुट्टी जाहीर केलेली नाही. फक्त ज्या जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले आहेत, तेथेच ही सुट्टी लागू राहणार आहे.September holiday
🔴सलग सुट्टीचा फायदा
या निर्णयामुळे काही जिल्ह्यांमध्ये नागरिकांना सलग तीन दिवस सुट्टीचा लाभ मिळणार आहे.