दि 10-01-2026
Retired Government Employees Benefits : नमस्कार मित्रानो पुणे महानगरपालिकेने (PMC) 2005 नंतर सेवेत दाखल झालेल्या निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक निर्णय घेतला आहे. या कर्मचाऱ्यांसाठीची आंशिक मोफत वैद्यकीय उपचार योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही योजना सुमारे दोन वर्षांपूर्वी बंद करण्यात आली होती, त्यामुळे अनेक निवृत्त कर्मचाऱ्यांना उपचारासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र आता महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या आदेशानंतर ही योजना पुन्हा कार्यान्वित करण्यात येत आहे. या निर्णयाला यापूर्वीच स्थायी समिती तसेच महासभेची मंजुरी मिळालेली आहे.
नोकरदारांसाठी खुशखबर! नवीन कामगार संहितेमुळे पगाराचा हिशोब बदलणार.Labour Code Salary Change
या योजनेच्या पुनरुज्जीवनामुळे सुमारे 9 हजारांहून अधिक निवृत्त कर्मचारी लाभ घेऊ शकणार आहेत. योजनेअंतर्गत पात्र कर्मचाऱ्यांना मोफत किंवा सवलतीच्या दरात वैद्यकीय उपचार सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
महानगरपालिकेच्या या निर्णयाचे निवृत्त कर्मचारी संघटनांकडून स्वागत करण्यात येत असून, हा निर्णय कर्मचारीहिताचा आणि दिलासादायक असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. अनेक दिवसांपासून या योजनेच्या पुनरारंभाची मागणी करण्यात येत होती, ती आता पूर्ण झाली आहे.
Retired Government Employees Benefits





