१ जुलैपासून बदलणार ‘हे’ ५ मोठे नियम – सामान्य माणसावर होणार थेट परिणाम!

📢 १ जुलैपासून बदलणार ‘हे’ ५ मोठे नियम – सामान्य माणसावर होणार थेट परिणाम! New Rules from 1 July 2025

New Rules from 1 July 2025 : नमस्कार मित्रानो १ जुलै २०२५ पासून देशभरात काही महत्वाचे नियम बदलणार आहेत. हे बदल तुमच्या खिशावर थेट परिणाम करणारे आहेत. रेल्वे भाडं, एटीएम शुल्क, गॅस सिलेंडरचे दर, क्रेडिट कार्ड व्यवहार आणि पॅन-आधार लिंकिंगसारख्या गोष्टींमध्ये मोठे अपडेट्स येत आहेत. चला तर पाहूया काय काय बदलणार आहे:

🚆 1. रेल्वेचं भाडं वाढणार!

  1. आता ट्रेनने प्रवास करणं थोडं महाग होणार आहे.
  2. नॉन-एसी कोचमध्ये दर किलोमीटर १ पैसे वाढ.
  3. एसी कोचमध्ये दर किलोमीटर २ पैसे वाढ.
  4. ➡️ प्रवास स्वस्त राहणार नाही!

🏧 2. ATM वापरणं होणार महाग

बँक एटीएमवर फक्त ३ मोफत व्यवहार मिळणार.
त्यापुढे प्रत्येक ट्रांजॅक्शनसाठी:

₹23 शुल्क काढण्यासाठी

₹8.5 शुल्क शिल्लक पाहण्यासाठी
➡️ बँकेच्या नियमांवर लक्ष ठेवा नाहीतर खिशाला कात्री लागेल!

🛢️ 3. गॅस सिलेंडरचे दर बदलणार

व्यावसायिक गॅसचे दर १ जुलैपासून

घरगुती गॅस दर ७ जुलैपासून बदलणार
➡️ LPG सबसिडीबाबत अजून निर्णय नाही.

💳 4. HDFC क्रेडिट कार्ड वापर महागणार

थर्ड पार्टी अॅप्स (जसे PhonePe, Paytm) वापरून पेमेंट केल्यास

आता १% अतिरिक्त शुल्क आकारलं जाणार
➡️ बिल भरण्यापूर्वी १० वेळा विचार करा!

🆔 5. PAN–आधार लिंक अनिवार्य. New Rules from 1 July 2025

  • आता पॅनकार्डसाठी आधार लिंक आवश्यक.
  • आधीपासून पॅन असलेल्यांनी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत लिंक केलं पाहिजे.
  • ➡️ लिंक न केल्यास आर्थिक व्यवहार अडथळ्यात येऊ शकतात.

Leave a Comment