मोबाईलच्या किमतींवर काय होणार परिणाम? जाणून घ्या सविस्तर माहिती. New GST Slab
या बदलामुळे अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी होणार आहेत. इतकेच नव्हे तर काही वाहनांचे दरही घटले असून टाटा आणि महिंद्राच्या काही मॉडेल्स आता ग्राहकांना कमी किमतीत उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे. मात्र यामध्ये सर्वांचा प्रश्न एकच – मोबाईल फोन स्वस्त होतील का?
मोबाईलच्या किमती जैसे थे. New GST Slab
भारतात सणासुदीच्या काळात मोबाईल खरेदीचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात वाढतो. पण नव्या जीएसटी स्लॅबमध्ये मोबाईल फोनवर कोणताही दिलासा मिळालेला नाही. यापूर्वी मोबाईलवर 18 टक्के जीएसटी लागू होता आणि नवीन बदलानंतरही तितकाच कर कायम ठेवण्यात आला आहे.
मोबाईल उत्पादक कंपन्यांनी यापूर्वीच सांगितले होते की, कर दर 5 टक्क्यांपर्यंत आणल्यासच मोबाईल स्वस्त होऊ शकतात. मात्र जीएसटी कौन्सिलकडून याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसल्याने मोबाईलच्या किमतींमध्ये बदल होणार नाही. त्यामुळे ग्राहकांना या बाबतीत दिलासा मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. New GST Slab
नवीन 40 टक्के स्लॅबची घोषणा. New GST Slab
जीएसटी कौन्सिलने या वेळेस आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नव्या व्यवस्थेत 5% आणि 18% असे दोन स्लॅब ठेवले असले तरी त्याचबरोबर 40 टक्क्यांचा एक नवीन स्लॅब लागू करण्यात आला आहे. या स्लॅबअंतर्गत मोठ्या वाहनांवर आणि तंबाखूजन्य उत्पादनांवर कर वाढवण्यात आला आहे. त्यामुळे या वस्तू अधिक महाग होणार आहेत.