Close Visit Mhshetkari

पाटोदा बसस्टॅण्डवर NCMC कार्डसाठी प्रवाशांची मोठी गर्दी; मुदतवाढ देण्याची मागणी. NCMC Card Update

पाटोदा बसस्टॅण्डवर NCMC कार्डसाठी प्रवाशांची मोठी गर्दी; मुदतवाढ देण्याची मागणी.  

📍 पाटोदा (प्रतिनिधी)

NCMC Card Update पाटोदा बसस्टॅण्ड येथे NCMC  काढण्यासाठी  मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी पाहायला मिळत आहे . एसटीच्या नव्या नियमानुसार सवलतीच्या प्रवासासाठी NCMC कार्ड अनिवार्य करण्यात आल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने बसस्थानकात दाखल झाले.

राज्य परिवहन मंडळाच्या सूचनेनुसार आता सवलतीच्या दरात प्रवास करण्यासाठी NCMC कार्ड आवश्यक आहे. यामुळे आतापर्यंत केवळ आधार कार्ड दाखवून सवलत घेणाऱ्या प्रवाशांना आता नवीन कार्ड काढणे बंधनकारक झाले आहे. परिणामी, सकाळपासूनच पाटोदा बसस्टॅण्ड परिसरात लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून आले.

महिलांचा आणि ज्येष्ठांचा अधिक प्रतिसाद NCMC Card Update

महिलांना ५० टक्के भाडे सवलत आणि ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाचा लाभ मिळण्यासाठी NCMC कार्ड आवश्यक असल्याने सर्वाधिक गर्दी या घटकांचीच होती. अनेक ज्येष्ठ नागरिकांना दीर्घकाळ रांगेत उभे राहावे लागत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली.

See also  महिलांसाठी विशेष FD योजना, SBI च्या FD योजनेतून नियमित उत्पन्न मिळवा. SBI Wife FD Scheme

सर्व्हर मंद गतीने; प्रक्रिया संथ

कार्ड नोंदणी आणि बायोमेट्रिक प्रक्रियेसाठी उपलब्ध कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने कामकाज संथ गतीने सुरू होते. काही वेळा तांत्रिक अडचणींमुळे सर्व्हर डाऊन होत असल्याची तक्रारही प्रवाशांनी केली.

मुदतवाढ देण्याची मागणी

प्रवाशांकडून NCMC कार्ड काढण्यासाठी दिलेली अंतिम तारीख वाढवून देण्याची मागणी करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना माहिती उशिरा मिळाल्याने अचानक वाढलेली गर्दी नियंत्रित करणे कठीण होत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

“अजून अनेकांना प्रक्रियेची पूर्ण माहिती नाही. शासनाने किमान 1 महिन्याची मुदतवाढ द्यावी,” अशी मागणी काही प्रवाशांनी केली. NCMC Card Update


सध्या पाटोदा बसस्टॅण्डवरील परिस्थिती लक्षात घेता, पुढील काही दिवसांतही गर्दी कायम राहण्याची शक्यता आहे. शासनाने मुदतवाढ दिल्यास प्रवाशांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Comment