पुणे महापालिकेत ५०० हून अधिक कर्मचाऱ्यांना शोकॉज नोटिस, वेळेवर न आल्याचा फटका.
Municipal employees punctuality
वेळ पाळणे बंधनकारक.
Municipal employees punctuality
महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी कार्यालयीन शिस्त कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, सकाळी वेळेत कामकाज सुरू होणे हे नागरिकांच्या सेवेसाठी अत्यावश्यक आहे. तरीसुद्धा कर्मचारी वेळेत न पोहोचल्याने कामकाज उशिरा सुरू होत होते.
विभाग प्रमुखांसह कर्मचारीही नोटिसबाज
या नोटिसमध्ये केवळ कनिष्ठ कर्मचारीच नव्हे तर काही विभाग प्रमुखांचाही समावेश आहे. दरवाज्यावर कर्मचाऱ्यांची उपस्थिती नोंदवून उशिरा येणाऱ्यांची यादी तयार करण्यात आली आणि लगेचच शोकॉज नोटिस देण्यात आल्या.
नागरिकांना होणारी गैरसोय.
Municipal employees punctuality
वेळेवर अधिकारी आणि कर्मचारी उपलब्ध नसल्याने अनेक नागरिकांना कामासाठी वारंवार फेऱ्या माराव्या लागत होत्या. यामुळे नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली होती.
दोन दिवसांत उत्तर आवश्यक
शोकॉज नोटिस मिळालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना दोन दिवसांच्या आत आपले स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे. अन्यथा पुढील अनुशासनात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
शिस्तीचा इशारा.
Municipal employees punctuality
पाच दिवसांचा कार्यदिवस आणि वाढीव कार्यालयीन तास लागू करूनही कर्मचारी वेळेत येत नाहीत. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी आता स्पष्ट इशारा दिला आहे की, वेळेचे काटेकोर पालन न केल्यास कठोर पावले उचलली जातील.