महिलेने एस.टी. कर्मचाऱ्याला मारल्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल; या घटनेने खळबळ. Msrtc Video Viral

महिलेने एस.टी. कर्मचाऱ्याला मारल्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल; या घटनेने खळबळ. Msrtc Video Viral 

पुणे | 30 मे 2025 – MSRTC Video viral : सोशल मीडियावर सध्या एक धक्कादायक व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक महिला एस.टी. कर्मचाऱ्याला सार्वजनिक ठिकाणी मारहाण करताना दिसत आहे. ही घटना नेमकी कुठे घडली याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही, मात्र व्हिडिओच्या आधारे सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसते की, एका बस आगारात महिला आणि एस.टी. कर्मचारी यांच्यात वाद होतो. वादाच्या भरात संबंधित महिला कर्मचाऱ्याला थेट थप्पड मारते. एक दोन न्हवे तर अनेकदा महिलेने मारलेले दिसत आहे.

आजूबाजूचे काही कर्मचारी हे पाहून आश्चर्यचकित होतात आणि काही जणांनी या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर टाकला तो सध्या संपूर्ण महाराष्ट्रात तुफान व्हायरल होत आहे. इंस्टाग्राम अकाउंट mazi_lalpri या अकाउंट वर व्हिडीओ पडल्यानंतर अवघ्या काही तासातच 2 मिलीयन लोकांनी तो पाहिला आहे.

See also  कर्ज घेणाऱ्यांसाठी मोठे अपडेट! RBI ने घेतला हा मोठा निर्णय, पटकन जाणून घ्या. RBI Update

महिलेला शिक्षा होणार का? 

या घटनेमुळे एस.टी. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) या घटनेची गंभीर दखल कधी घेणार हे पाहणे महत्वाचे असून, संबंधित अधिकारी काय निर्णय देतात हे पाहणे महत्वाचे आहे. Msrtc news 

Read more…काय सांगतो कायदा वाचा क्लिक करून 

दरम्यान, सोशल मीडियावर नागरिकांनी महिलेच्या वर्तनाचा निषेध केला असून, एस.टी. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी अधिक कडक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. पोलिसांकडून तपास सुरू असून, लवकरच अधिकृत माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

जर कर्मचाऱ्याला बाहेरील व्यक्तीने मारहाण केली, तर कायदा काय सांगतो? संपूर्ण मार्गदर्शक. legal action for employee assault

Leave a Comment