एसटी महामंडळ होणार स्वावलंबी! मोकळ्या जागेवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा.

🚍 एसटी महामंडळ होणार स्वावलंबी!
मोकळ्या जागेवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

मुंबई : Msrtc news Today महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) आता आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने मोठे पाऊल टाकणार आहे. एसटीच्या मोकळ्या जागांवर तसेच कार्यशाळा आणि बसस्थानकांच्या छतांवर ‘सौर ऊर्जा प्रकल्प’ उभारून वर्षाला सुमारे ३०० मेगावॅट वीज निर्मितीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या प्रकल्पाद्वारे सुमारे १,००० कोटी रुपयांची वीजनिर्मिती होणार असून, एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचा संकल्प परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.

ही माहिती त्यांनी एसटी महामंडळाच्या सभागृहात घेतलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिली. या वेळी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

🔆 राज्यातील पहिला ‘सौर ऊर्जा हब’ MSRTC News Today 

मंत्री सरनाईक म्हणाले की, “एसटी महामंडळाचा ‘सौर ऊर्जा हब’ हा भविष्यात संपूर्ण राज्यासाठी पथदर्शक ठरणार आहे. महामंडळाच्या उपलब्ध जागांवर तसेच खाजगी आणि सार्वजनिक भागीदारीत विविध विकास प्रकल्प उभारले जाणार आहेत. त्याचबरोबर उरलेल्या मोकळ्या जागांवर ‘सौर ऊर्जा शेती’ विकसित करून वीज निर्मिती केली जाईल.”

See also  कर्मचाऱ्यांसाठी आणि निवृत्तांसाठी मोठा दिलासा, पहा संपूर्ण माहिती.

सध्या एसटी महामंडळाला आपल्या आस्थापनांकरिता वर्षाला १५ मेगावॅट वीज लागते, ज्यासाठी दरवर्षी २५ ते ३० कोटी रुपयांचा खर्च महावितरणकडे जातो. भविष्यात इलेक्ट्रिक बसांच्या चार्जिंगसाठी अंदाजे २८० मेगावॅट वीज आवश्यक होणार आहे.

जर ही वीज एसटी महामंडळाने स्वतः सौरऊर्जेतून निर्माण केली, तर दरवर्षी सुमारे १,००० कोटी रुपयांची बचत होऊ शकते. त्यामुळे ही वीज निर्मिती भविष्यात एसटीसाठी उत्पन्नाचा नवा स्त्रोत ठरेल, असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला.

⚡ शासनाच्या ओसाड जमिनींचाही वापर. Msrtc news 

३०० मेगावॅट क्षमतेचा हा सौरऊर्जा प्रकल्प राज्यातील विविध ठिकाणी उभारला जाणार असून, गरज पडल्यास शासनाच्या ओसाड जमिनींवरही प्रकल्प उभारले जातील. यासाठी शासनाची परवानगी घेऊन नाममात्र भाडे आकारणीच्या अटीवर सौर प्रकल्प राबवले जातील.

See also  Individual Health Insurance Plan

केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांमधून मिळणारे आर्थिक साहाय्य या प्रकल्पासाठी वापरले जाणार आहे. त्यामुळे भविष्यात एसटी महामंडळाला शासनाकडे आर्थिक मदतीसाठी वारंवार हात पसरावे लागणार नाहीत.

🌍 राज्यातील आदर्श ठरणारा प्रकल्प. Msrtc update 

मंत्री सरनाईक म्हणाले, “एसटी महामंडळाचा हा ‘सौर ऊर्जा हब’ प्रकल्प केवळ एसटीलाच नव्हे, तर संपूर्ण राज्याला पर्यावरणपूरक आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरेल. महाराष्ट्रात सौर ऊर्जा निर्मितीचा आदर्श उभा करणारा हा प्रकल्प म्हणून त्याची ओळख निर्माण होईल.”

👉 थोडक्यात:

  1. एसटीच्या मोकळ्या जागांवर सौरऊर्जा प्रकल्प उभारणार.
  2. दरवर्षी ३०० मेगावॅट वीज निर्मितीचे लक्ष्य.
  3. १,००० कोटी रुपयांची संभाव्य बचत.
  4. शासनाच्या ओसाड जमिनींचा वापर.
  5. प्रकल्पामुळे एसटी होणार आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी

 

Leave a Comment