मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील बोगस लाभार्थ्यांचा सुळसुळाट. Mazi Ladki Bahin Yojana
मुंबई :
Mazi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सत्ताधाऱ्यांसाठी निवडणुकीत वरदान ठरली होती. परंतु आता हीच योजना सरकारला डोईजड ठरत असल्याचे चित्र दिसत आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांत लाखो बोगस लाभार्थी उघड झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
निवडणुकीपूर्वी कोणतीही पडताळणी न करता बहिणींना थेट दीड हजार रुपये देऊन सत्ताधाऱ्यांनी मतांचा गडी साधला होता. मात्र, सरकारच्या अलीकडील शोधमोहिमेत या योजनेचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, खुद्द दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यांत सर्वाधिक बोगस लाभार्थी आढळून आले आहेत.Mazi Ladki Bahin Yojana
अजित पवार यांच्या पुणे जिल्ह्यात तब्बल दोन लाख बोगस लाडक्या बहिणींचा लाभ घेण्याचा प्रकार समोर आला आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात दीड लाख अपात्र लाभार्थी नोंदले गेले आहेत. छगन भुजबळ, दादा भुसे, माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवाळ यांच्या मतदारसंघांतही सुमारे 1 लाख 86 हजार अपात्र लाभार्थी आढळून आले.
कोल्हापूर जिल्ह्यात हसन मुश्रीफ आणि प्रकाश आंबिटकर यांच्या भागात 1 लाख 14 हजार, नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गडात 95 हजार 500, रायगडमध्ये आदिती तटकरे यांच्या जिल्ह्यात 63 हजार, तर बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्या जिल्ह्यात 71 हजार बोगस बहिणी लाभार्थी ठरल्या आहेत. लातुरात बाबासाहेब पाटील यांच्या भागात 69 हजार लाभार्थी आढळून आले आहेत. Mazi Ladki Bahin Yojana
या प्रकारामुळे राज्य सरकारने आता सर्व लाभार्थ्यांची पुन्हा एकदा केवायसी व पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या अनियमिततेवर भाष्य करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “मग योजना बंद करू का?” असा सवाल उपस्थित केला.
👉 राज्याच्या तिजोरीवर ताण वाढवणाऱ्या या बोगस लाभार्थ्यांमुळे सरकारला कठोर पावले उचलावी लागणार हे स्पष्ट झाले आहे. Mazi Ladki Bahin Yojana