मराठा आरक्षण आंदोलनाला यश : सरकारने केल्या सात महत्त्वाच्या मागण्या मान्य. Maratha Reservation
मुंबई, 2 सप्टेंबर 2025 – maratha Reservation : नमस्कार मित्रानो मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाला ऐतिहासिक यश मिळाले आहे. राज्य सरकारने आंदोलनकर्त्यांच्या सातही प्रमुख मागण्या मान्य केल्या आहेत.
यामध्ये हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी हा निर्णय सर्वात महत्त्वाचा मानला जात आहे. आता कुळसंबंधित पुराव्यांवर आधारित प्रमाणपत्र देण्याचा मार्ग खुला झाला आहे. जर नातेवाईकांकडे मराठा असल्याचा पुरावा असेल, तर संबंधित व्यक्तीलाही मराठा प्रमाणपत्र मिळणार आहे.
मनोज जरांगे यांनी आझाद मैदानावर झालेल्या जाहीर सभेत सांगितले, “आम्ही जिंकलो आहोत. सरकारने रात्री 9 वाजेपर्यंत GR काढला तर आंदोलनाची समाप्ती जाहीर करू.” Maratha Reservation
दरम्यान, बॉम्बे हायकोर्टाने आंदोलनकर्त्यांना आदेश दिला आहे की त्यांनी आझाद मैदान तात्काळ रिकामे करावे. अन्यथा कायदेशीर कारवाईचा सामना करावा लागू शकतो.
या निर्णयामुळे मराठा समाजामध्ये समाधानाची भावना व्यक्त होत असून, पुढील राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे. Maratha Reservation