राज्यात पुन्हा पावसाचा जोर – मराठवाड्यासह अनेक भागांना दिलासा. Maharashtra Rain Forecast 2025

राज्यात पुन्हा पावसाचा जोर – मराठवाड्यासह अनेक भागांना दिलासा. Maharashtra Rain Forecast 2025

पुढील तीन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता

Maharashtra Rain Forecast 2025 :  हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांच्या अंदाजानुसार, राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. २८ ते ३० ऑगस्ट दरम्यान मुंबई, पुणे, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा या भागांत जोरदार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पडेल. या पावसामुळे ओढे-नाले वाहू शकतात, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सप्टेंबरच्या सुरुवातीला पुन्हा मुसळधार पाऊस. Maharashtra Rain Forecast 2025

३० ऑगस्टनंतर दोन ते तीन दिवस पावसाचा जोर थोडा कमी राहील. मात्र, सप्टेंबरच्या सुरुवातीला पुन्हा एकदा पावसाची जोरदार परतफेड होणार असल्याचे संकेत आहेत. ४, ५, ६ आणि ७ सप्टेंबर या सलग चार दिवसांत राज्यभरात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

मराठवाड्यासह अवर्षणग्रस्त भागांना दिलासा

या काळात कोकण, नाशिक, पुणे, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ तसेच मराठवाडा या सर्व भागांत पावसाची तीव्रता वाढेल. विशेषतः मराठवाडा आणि काही अवर्षणग्रस्त जिल्ह्यांसाठी हा पाऊस दिलासादायक ठरणार आहे. जालना, बीड, अहमदनगर आणि सांगलीसह पाणीटंचाई जाणवत असलेल्या भागांना पावसाचा मोठा फायदा होईल.

शेती व पाणीसाठ्यांना मदत Maharashtra Rain Forecast 2025

या मुसळधार पावसामुळे शेततळी व पाणीसाठे भरतील, तसेच पिकांना जीवनदान मिळेल. शेतीला आणि शेतकऱ्यांना याचा थेट फायदा होईल, अशी अपेक्षा आहे. राज्यातील नागरिक आणि शेतकरी वर्गाने हवामान खात्याच्या सूचनांनुसार योग्य काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment