Created by Amit, Date- 28 ऑगस्ट 2025
राज्यात पावसाचा धुमाकूळ; ५ सप्टेंबरपर्यंत मुसळधार बरसणार. Maharashtra Rain Alert
मराठवाड्यात नांदेड, लातूर, हिंगोली, धाराशिव या जिल्ह्यांत सकाळपासूनच पावसाचा जोर आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या भागात विजांसह जोरदार सरी सुरू आहेत. तर उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांतही पावसाने हजेरी लावली आहे. Maharashtra Rain Alert
पुढील २४ तासांत काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा दिला असून, नांदेड आणि लातूर जिल्ह्यांत विशेष सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोकण किनारपट्टीवरही पावसाचा जोर वाढणार आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
पुणे, नाशिक, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावरही पावसाचा जोर दिसून येईल. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या मुसळधार पावसामुळे नागरिकांनी सुरक्षित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांसाठी हा पाऊस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. मात्र, सलग ८ ते १० दिवस पाऊस सुरू राहू शकतो, त्यामुळे शेतकऱ्यांनी फवारणी व खत व्यवस्थापनासारखी कामे लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावीत, असा सल्ला हवामान तज्ज्ञांनी दिला आहे. Maharashtra Rain Alert