महाराष्ट्रात मान्सूनची धडक , कोकणासह,  मराठवाड्यातील 5 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट. Maharashtra Rain Alert

महाराष्ट्रात मान्सूनची धडक , कोकणासह,  मराठवाड्यातील 5 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट. Maharashtra Rain Alert

पुणे | २५ मे २०२५, प्रतिनिधी.
Maharashtra Rain Alert :  नमस्कार मित्रानो भारतीय हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्रासाठी पावसाचा अलर्ट जाहीर केला आहे. यंदा मान्सूनने अपेक्षेपेक्षा लवकर म्हणजेच २५ मे रोजीच राज्यात प्रवेश केला असून, संपूर्ण महाराष्ट्रात पुढील काही दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


राज्यभरात पावसाचा इशारा:

  • रेड अलर्ट:
    मुंबई, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता असल्याने रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत रविवारी रात्रीपासूनच जोरदार पाऊस सुरु असून अनेक ठिकाणी पाणी साचले आहे.
  • ऑरेंज अलर्ट:
    रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. घाटमाथ्यावर विशेषतः अतिवृष्टीची शक्यता आहे. या भागात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांचाही इशारा देण्यात आला आहे.
See also  तुमची ही बँकेत असेल FD तर तुमच्या साठी आनंदाची बातमी,  जाणून घ्या सर्व माहिती. Bank update

प्रभावित भाग आणि परिस्थिती:

  • मुंबई:
    शहरात मे महिन्यातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. कोलाबा वेधशाळेने विक्रमी पावसाची नोंद केली असून, पाणी तुंबल्यामुळे वाहतूक कोंडी व झाडे कोसळण्याच्या घटना समोर येत आहेत.
  • पुणे:
    गेल्या ६४ वर्षांतील सर्वाधिक मे पावसाची नोंद पुण्यात झाली आहे. शहरात अनेक भागांत सरासरीच्या अनेकपट पाऊस झाला आहे.
  • बीडपुढील 24 तासात मराठवाड्यासह बीड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे, तरी नागरिकांनी सुरक्षित राहण्याच्या सूचना प्रशासनामार्फत देण्यात आल्या आहेत.

नागरिकांसाठी सूचना:

  • अनावश्यक प्रवास टाळा आणि घरात सुरक्षित राहा.
  • हवामान खात्याचे अपडेट्स वेळोवेळी तपासत राहा.
  • घाट भागात किंवा पूरप्रवण क्षेत्रात विशेष काळजी घ्या.
  • आपत्कालीन स्थितीसाठी आवश्यक वस्तूंची तयारी ठेवा.
See also  आता UPI वर मिळणार हातउसने पैसे; 45 दिवस बिनव्याजी वापरण्याची सुविधा सुरू. No Cost Credit facility

Maharashtra Rain Alert


राज्य सरकार आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग सतर्क असून, मदत कार्यांसाठी यंत्रणा सज्ज आहे. नागरिकांनी अधिकृत सूचना आणि अलर्टकडे लक्ष द्यावे आणि प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment