सरकारचा मोठा निर्णय महाराष्ट्रात कर्मचाऱ्यांचे कामाचे तास वाढवण्याचा प्रस्ताव. Maharashtra government decision on working hours
मुंबई : Maharashtra government decision on working hours :
महाराष्ट्र सरकारने कामाचे तास वाढवण्याच्या प्रस्तावावर विचार सुरू केला आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत कामगार विभागाने हा प्रस्ताव सादर केला. सध्या कामाचे तास 9 आहेत, मात्र ते वाढवून 10 तास करण्याचा विचार आहे. याशिवाय महिलांना नाईट शिफ्टमध्ये काम करण्यास परवानगी देण्याचाही मुद्दा प्रस्तावात समोर आला आहे. कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी सांगितले की, याबाबत चर्चा सुरू आहे, मात्र अजून कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. तरीसुद्धा या प्रस्तावामुळे नवी चर्चा रंगली आहे.
हा बदल लागू झाला, तर महाराष्ट्र शॉप्स अँड एस्टॅब्लिशमेंट्स (रेग्युलेशन ऑफ एम्प्लॉयमेंट अँड कंडीशन्स ऑफ सर्व्हिस) कायदा, 2017 मध्ये दुरुस्ती करावी लागेल. या कायद्यानुसार दुकाने, हॉटेल्स, मनोरंजन केंद्रे आणि खासगी व्यवसायांमधील कामाचे तास व नोकरीच्या अटी ठरवल्या जातात.
उद्योगांना फायदा की तोटा? Maharashtra government decision on working hours
या प्रस्तावावर PHDCCI चे CEO व सचिव रणजीत मेहता यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांच्या मते, सरकारचा हा निर्णय उत्पादनवाढीसाठी उपयुक्त ठरू शकतो. परंतु कामाचे तास वाढवल्याने काही नकारात्मक परिणामही होण्याची शक्यता आहे.
महिलांच्या सुरक्षेवर भर. Maharashtra government decision on working hours
महिलांच्या नाईट शिफ्टच्या मुद्द्यावर मेहता यांनी स्पष्ट केले की, महिलांना रात्री काम करण्याची मुभा दिली पाहिजे. मात्र त्यासाठी कार्यस्थळी सुरक्षित वातावरण निर्माण करणे अत्यावश्यक आहे. तसेच, नाईट शिफ्ट करणाऱ्या महिलांसाठी पिकअप-ड्रॉप सेवा देणे बंधनकारक असावे, अशी मागणी त्यांनी केली.