Close Visit Mhshetkari

राज्य कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक संकेत; वेतनश्रेणी बदलांचा प्रस्ताव मंत्रिमंडळात जाणार. Maharashtra Government Employees Salary

मुंबई :  Maharashtra Government Employees Salary : राज्यातील अनेक कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणींमध्ये सातव्या वेतन आयोगानुसार मोठ्या तफावती निर्माण झाल्या आहेत. या तफावती दूर करण्यासाठी सरकारने खुल्लर समिती स्थापन केली होती. मात्र, या समितीने काही निवडक पदांनाच सुधारित वेतनश्रेणी सुचवल्याने अनेक कर्मचारी वर्ग वंचित राहिला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती.

ही नाराजी हिवाळी अधिवेशनादरम्यान उघडपणे समोर आली. महसूल विभागातील कर्मचारी आणि राज्यभरातील लिपिक संघटनांनी एकत्र येत विधानसभेवर विराट मोर्चा काढला. वेतनश्रेणीतील अन्याय दूर करावा आणि विशेष वेतनवाढ लागू करावी, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.
दरम्यान, महसूल विभागातील कर्मचाऱ्यांचा सुरू असलेला बेमुदत संप महसूल मंत्र्यांच्या सकारात्मक आश्वासनानंतर मागे घेण्यात आला आहे. महसूल विभागाचा सुधारित आकृतीबंध मंजूर करणे, कर्मचाऱ्यांसाठी विशेष वेतनवाढीचा प्रस्ताव तयार करणे तसेच काही पदांसाठी सुधारित वेतनश्रेणी लागू करणे, या मागण्यांवर सरकारकडून विशेष प्रस्ताव तयार केला जात आहे. हा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्यात येणार आहे.
दुसरीकडे, राज्यातील लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांवर चौथ्या वेतन आयोगापासून अन्याय होत असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे. खुल्लर समितीत लिपिक पदांचा विचार न झाल्याने या वर्गात असंतोष वाढला असून याच कारणामुळे लिपिक संघटनांनी अधिवेशन काळात मोठा मोर्चा काढला होता. सरकारने त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले आहे. Maharashtra Government Employees Salary
आता महसूल विभाग आणि लिपिक कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणींमध्ये बदल होतील का, विशेष वेतनवाढ मंजूर होणार का, याकडे राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment