राज्यातील या कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येणार , मिळणार सक्तीची सेवानिवृती. Maharashtra Employees Update

Created by Amit, Date- 13-12-2025

Maharashtra Employees Update : राज्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गांवर अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा (TET) उत्तीर्ण होणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयामुळे शिक्षक वर्गात अस्वस्थता निर्माण झाली असून, याबाबत शिक्षण मंत्री दादा भुसे यांनीही दिलेल्या मुदतीत TET उत्तीर्ण करणे अनिवार्य असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.

या पार्श्वभूमीवर शिक्षकांना TET किंवा CTET परीक्षा किती वेळा देता येणार, याबाबतची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे आहे.

२०२६ मध्ये दोन वेळा TET परीक्षा. Maharashtra Teachers Update

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत २०२६ या वर्षात जून आणि डिसेंबर महिन्यात शिक्षक पात्रता परीक्षा (TET) घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यापूर्वी ही परीक्षा वर्षातून एकदाच घेतली जात होती. मात्र, उमेदवारांना अधिक संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आता वर्षातून दोन सत्रांमध्ये परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती परीक्षा परिषदेचे आयुक्त डॉ. नंदकुमार बेडसे यांनी दिली आहे.

CTET हा देखील पर्याय उपलब्ध

राज्यातील शिक्षकांसाठी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) हाही एक महत्त्वाचा पर्याय आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (CBSE) घेतली जाणारी CTET परीक्षा केंद्र सरकारच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी आवश्यक असते. आगामी ८ फेब्रुवारी २०२६ रोजी CTET परीक्षा होणार असून, त्यासाठी सध्या अर्ज प्रक्रिया सुरू आहे.

तीन वेळा CTET देण्याची संधी

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अंतिम मुदतीत शिक्षकांना तीन वेळा CTET परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे शिक्षकांनी TET किंवा CTET यापैकी किमान एक परीक्षा मुदतीत उत्तीर्ण करणे बंधनकारक ठरणार आहे.

परीक्षा प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे प्रयत्न

एका TET परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया, कागदपत्रांची पडताळणी, परीक्षा आयोजन आणि उत्तरपत्रिकांची तपासणी यासाठी साधारणपणे सहा महिन्यांचा कालावधी लागतो. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर ही संपूर्ण प्रक्रिया अधिक जलद करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, दिलेल्या संधींचा योग्य वापर करून शिक्षकांनी वेळेत TET किंवा CTET परीक्षा उत्तीर्ण करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. Maharashtra Teachers Update

Leave a Comment