लाडकी बहीण योजना: 2 महिन्याचा हफ्ता होणार जमा महिलांच्या खात्यात  येणार ₹३,००० रुपये. Ladaki Bahin Yojana 

लाडकी बहीण योजना: 2 महिन्याचा हफ्ता होणार जमा महिलांच्या खात्यात  येणार ₹३,००० रुपये. Ladaki Bahin Yojana 

Ladaki Bahin Yojana  : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांसाठी मकरसंक्रांतीला आनंदाची बातमी मिळणार आहे. डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांचा हप्ता एकत्रितपणे देण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला असून, महिलांच्या खात्यात थेट ₹३,००० जमा होणार आहेत.

याबाबत माहिती देताना भाजप नेत्या आणि दहिसरमधील उमेदवार तेजस्वी घोसाळकर यांनी सांगितले की, डिसेंबरचे ₹१,५०० आणि जानेवारीचे ₹१,५०० असे दोन्ही हप्ते एकाच वेळी जमा केले जाणार आहेत. ही रक्कम १४ जानेवारी २०२६ (मकरसंक्रांत) पूर्वी सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात DBT प्रणालीद्वारे जमा केली जाईल. Ladaki Bahin Yojana

See also  या कर्मचाऱ्यांना निवृत्ती नंतर दिलासा, 2005 नंतर च्या कर्मचाऱ्यांना पुन्हा मोफत वैद्यकीय उपचार सुरु. Retired Government Employees Benefits

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘लाडकी बहीण’ योजना चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे. विविध राजकीय पक्षांकडून या योजनेचा प्रचार करण्यात येत असून, महिला मतदारांपर्यंत सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती पोहोचवण्यावर भर दिला जात आहे.

दरम्यान, लाभार्थी महिलांनी आपला अर्ज मंजूर आहे का, बँक खाते आधारशी लिंक आहे का आणि ई-केवायसी पूर्ण झाली आहे का, याची खात्री करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आवश्यक अटी पूर्ण असतील तर मकरसंक्रांतीपूर्वी दुहेरी हप्ता खात्यात जमा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. Ladaki Bahin Yojana

Leave a Comment