जालना–तिरुपती विशेष ट्रेन सेवा 7 जुलैपासून सुरू; या भागातुन धावणार भाविकांसाठी दिलासादायक निर्णय. Jalna Tirupati Special Train

जालना–तिरुपती विशेष ट्रेन सेवा 7 जुलैपासून सुरू; या भागातुन धावणार भाविकांसाठी दिलासादायक निर्णय. Jalna Tirupati Special Train

जालना, 20 जून 2025 — प्रतिनिधी.

Jalna Tirupati Special Train  : नमस्कार मित्रानो मराठवाड्यातील भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जालना आणि तिरुपती दरम्यान विशेष ट्रेन सेवा पुन्हा सुरू होणार असून, ही सेवा 7 जुलैपासून कार्यान्वित होणार आहे. दक्षिण मध्य रेल्वे विभागाने ही विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला असून, ही सेवा 31 मार्च 2026 पर्यंत चालणार आहे.

या गाडीचे संचलन दर आठवड्याला एकदा होणार आहे. जालना येथून दर सोमवारी सकाळी 7 वाजता ट्रेन तिरुपतीकडे रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी, म्हणजे मंगळवारी सकाळी 10.45 वाजता तिरुपती स्थानकात पोहोचेल. परतीचा प्रवास मंगळवारी दुपारी 3.15 वाजता सुरू होईल आणि बुधवारी दुपारी 3.50 वाजता जालन्यात ट्रेन पोहोचेल. Jalna Tirupati Special Train

या मार्गावर ट्रेन परतूर, सेलू, मानवत रोड, परभणी, गंगाखेड, परळी वैजनाथ, लातूर रोड, विकाराबाद, लिंगमपल्ली, गुडूर आणि रेनिगुंटा अशा महत्त्वाच्या स्थानकांवर थांबेल. या विशेष गाडीमुळे जालना आणि परिसरातील तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या गाडीमध्ये स्लीपर, एसी 3-टायर, एसी 2-टायर आणि जनरल कोच्सची सुविधा दिली जाणार आहे. लवकरच तिकीट बुकिंगसाठी संबंधित माहिती IRCTC च्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होईल.

सण, वीकेंड आणि धार्मिक काळात तिरुपतीकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असते. त्यामुळे ही गाडी भाविकांसाठी आणि पर्यटकांसाठी एक महत्त्वपूर्ण पर्याय ठरणार आहे. रेल्वेच्या या निर्णयाचे अनेक प्रवासी संघटनांनी स्वागत केले आहे. Jalna Tirupati Special Train

रेल्वे प्रशासनाकडून अपील करण्यात आले आहे की, या विशेष ट्रेनचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांनी वेळापत्रकानुसार प्रवास करावा आणि सुरक्षेच्या दृष्टीने दिलेल्या सूचनांचे पालन करावे.

Leave a Comment