Close Visit Mhshetkari

ITR Filing 2025: आयटीआर भरण्यासाठी ‘हे’ 8 महत्वाचे कागदपत्रे ठेवा तयार, नाहीतर होऊ शकतो मोठा त्रास!

ITR Filing 2025: आयटीआर भरण्यासाठी ‘हे’ 8 महत्वाचे कागदपत्रे ठेवा तयार, नाहीतर होऊ शकतो मोठा त्रास!

25 जून 2025 | मुंबई

Income Tax Return : जर तुम्ही अद्याप तुमचा Income Tax Return (ITR) भरलेला नसेल, तर आता वेळ वाया घालवू नका! केंद्र सरकारने आर्थिक वर्ष 2024-25 साठी आयटीआर भरण्याची अंतिम तारीख 15th September, 2025 जाहीर केली आहे. यानंतर उशिरा रिटर्न भरल्यास दंड आकारला जाऊ शकतो. त्यामुळे वेळेत रिटर्न भरणं अत्यंत आवश्यक आहे.

मात्र, आयटीआर फाईल करण्याआधी काही महत्त्वाची कागदपत्रं तयार ठेवणं आवश्यक आहे. ही कागदपत्रे आधीच तयार असल्यास रिटर्न भरण्याची प्रक्रिया सुलभ होते.

ही बँक देत आहे 5 मिनिटांत 5 लाखांपर्यंत कर्ज, घरबसल्या करू शकता अर्ज, जाणून घ्या अधिक माहिती. Personal loan

चला पाहूया, ITR Filing करताना कोणती 8 कागदपत्रे आवश्यक असतात:

1. PAN कार्ड. Income Tax Return

पॅन (PAN) कार्ड हे आयटीआरसाठी सर्वात मूलभूत कागदपत्र आहे. हे आयकर खात्याशी तुमची ओळख जोडते.

2. Aadhaar कार्ड. Income Tax Return

ITR दाखल करताना आधार क्रमांक देणं अनिवार्य आहे. पॅन व आधार लिंक असणंही आवश्यक आहे.

3. बँक स्टेटमेंट / पासबुक

बँक खात्यातील व्यवहार, व्याज आणि इतर उत्पन्नाची माहिती बँक स्टेटमेंटमधून मिळते. त्यामुळे ते आवश्यक आहे.

4. Form 16 (सर्व्हिस करणाऱ्यांसाठी)

नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी त्यांच्या नियोक्त्याने दिलेले फॉर्म 16 महत्त्वाचे असते. यात एकूण पगार, कपात, आणि टीडीएसची माहिती असते.

5. Form 26AS

हे दस्तऐवज आयटी विभागाच्या वेबसाइटवरून डाउनलोड करता येते. यात तुमच्यावर आकारलेला आणि कपात केलेला टीडीएस (TDS) नमूद असतो.

6. Investment कागदपत्रे (Tax Saving)

Section 80C, 80D, 80G इ. अंतर्गत तुम्ही केलेल्या गुंतवणुकीचे पुरावे जसे की PPF, LIC, ELSS, वैद्यकीय विमा, दान यांची कागदपत्रं तयार ठेवावीत.

7. भाडेकरार (House Rent)

जर तुम्ही घरभाड्याचा लाभ घेणार असाल, तर भाडेकरार आणि भाड्याच्या पावत्या आवश्यक आहेत.

8. इतर उत्पन्नाचे पुरावे. Income Tax Return

बँक एफडी, शेअर्स, म्युच्युअल फंड्स, भाडे उत्पन्न, कॅपिटल गेन इ. मधून मिळणाऱ्या उत्पन्नाची माहिती आणि त्याचे पुरावे लागतात.

राज्य कर्मचारी सेवा नियमावलीत महत्त्वाचे बदल, सरकारने घेतला मोठा निर्णय. Maharashtra State Employee Rules

चुकीची माहिती दिल्यास दंड होणार. Income Tax Return

जर रिटर्न भरताना चुकीची माहिती दिली गेली किंवा आवश्यक कागदपत्रांचा अभाव आढळला, तर आयकर विभाग कारवाई करू शकतो. यामुळे तुमच्यावर दंड आकारला जाऊ शकतो.

Leave a Comment