महाराष्ट्रात पुढील पाच दिवस अतिवृष्टीचा इशारा, हेल्पलाईन नंबर जाहीर.
प्रतिनिधी, 17 ऑगस्ट 2025 मुंबई :
IMD red alert Maharashtra : भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रात 21 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. विशेषतः कोकण, मध्य महाराष्ट्र घाट भाग आणि मराठवाडा येथे अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यावेळी विजांचा कडकडाट, गडगडाट आणि 40-50 किमी वेगाने वाहणारे वादळी वारे अनुभवायला मिळू शकतात.
मराठवाड्यात लातूर, बीड, नांदेड परभणी, उस्मानाबाद जिल्हामध्ये काही ठिकाणी यल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे.
कोस्टल भागात समुद्र खवळलेला राहील, त्यामुळे मच्छिमारांना पुढील काही दिवस समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. रायगडातील अंबा नदी, तर रत्नागिरीतील कुंडलिका, जगबुडी व कोदवली नद्या धोका मर्यादेपलीकडे वाहत असून, प्रशासनाने पूरस्थितीवर लक्ष ठेवले आहे.
IMD red alert Maharashtra
आपत्कालीन मदतीसाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाने हेल्पलाईन क्रमांक जाहीर केले आहेत – ०२२-२२०२७९९०, ०२२-२२७९४२२९, ०२२-२२०२३०३९ तसेच मोबाईल क्रमांक ९३२१५८७१४३.
नागरिकांना प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे की, अनावश्यक प्रवास टाळावा, सुरक्षित ठिकाणी राहावे आणि परिस्थिती बिकट झाल्यास तातडीने मदत क्रमांकावर संपर्क साधावा. पावसाळी वातावरणात दक्षता घेतल्यास संभाव्य धोके टाळता येऊ शकतात.
IMD red alert Maharashtra