खुशखबर गणेशोत्सवानिमित्त शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन व निवृत्तीवेतन आगाऊ रक्कम. Govt Salary Release.
मुंबई | 21 ऑगस्ट 2025
Govt Salary Release : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील शासकीय अधिकारी-कर्मचारी तसेच निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांना ऑगस्ट महिन्याचे वेतन व निवृत्तीवेतन १ सप्टेंबर 2025 ऐवजी २६ ऑगस्ट 2025 रोजी आगाऊ देण्यात येणार आहे.
गणेशोत्सव हा राज्यातील सर्वात मोठा सण असून, कर्मचारी व निवृत्तीवेतनधारक यांना या दिवशी सण साजरा करण्यासाठी कोणतीही आर्थिक अडचण येऊ नये यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे.
शासन निर्णयातील महत्त्वाचे मुद्दे: Govt Salary Release
1. ऑगस्ट 2025 महिन्याचे वेतन व निवृत्तीवेतन दिनांक 26 ऑगस्ट 2025 रोजी अदा करण्यात येईल.
2. या निर्णयामध्ये सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी, अनुदानित शैक्षणिक संस्था, कृषी विद्यापीठे आणि त्यांना संलग्न संस्था यांचा समावेश आहे.
3. संबंधित कोषागार कार्यालयांनी व लेखा कार्यालयांनी वेतन व निवृत्तीवेतन आगाऊ देण्याची तयारी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
4. सर्व विभागीय लेखा नियंत्रक व कोषागार अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करावी, असे शासनाने स्पष्ट केले आहे.
नागरिकांसाठी दिलासा. Govt Salary Release
गणेशोत्सवाच्या दिवसांत शासकीय कर्मचारी व निवृत्तीवेतनधारकांना आर्थिक सोय उपलब्ध व्हावी, याकरिता दरवर्षीप्रमाणे यंदाही वेतन व पेन्शन आगाऊ दिले जात आहे. यामुळे लाखो कुटुंबांना दिलासा मिळणार आहे.