या सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत; गणेशोत्सवाला आंदोलनाचा इशारा सरकारकडे तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी. Employees Payment News  

28 ऑगस्ट 2025Employees Payment News : नमस्कार मित्रानो महाराष्ट्रातील आश्रमशाळा कर्मचाऱ्यांना अजूनही जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचे वेतन मिळालेले नाही. यामुळे कर्मचाऱ्यांना प्रचंड आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. गणेशोत्सवाच्या आधीच वेतन देण्याचे आदेश असूनदेखील संबंधित विभागाकडून वेळेवर निधी वितरित न झाल्याने ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

आमदार सुधाकर अडबाले यांनी मागास बहुजन कल्याण आयुक्त व वित्त विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र पाठवून या प्रकरणी तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. कर्मचाऱ्यांचे गृहकर्ज, बँक हप्ते, LIC तसेच इतर आर्थिक जबाबदाऱ्यांवर उशीर झाल्याने त्यांना मोठा दंड व अतिरिक्त व्याज सहन करावे लागत असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. Employees Payment New

कर्मचारी संघटनांनी देखील सरकारकडे तीव्र नाराजी व्यक्त करत, जर तात्काळ वेतन वितरित झाले नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. Employees Payment New

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *