या विभागातील 80% कर्मचाऱ्यांना सप्टेंबरपासून पगारवाढ, तरीही 12 हजार कर्मचाऱ्यांची कपात. Employees Payment
मुंबई | 27 ऑगस्ट 2025 –
ही वाढ प्रत्यक्षात एप्रिल 2025 मध्ये होणार होती, मात्र जागतिक आर्थिक परिस्थितीतील अनिश्चिततेमुळे ती पाच महिने पुढे ढकलण्यात आली होती. यामध्ये ट्रेनिंग लेव्हलपासून C3A (असिस्टंट कन्सल्टंट) पर्यंतचे – म्हणजेच नवशिके ते मिड-लेव्हल कर्मचारी – या सर्वांचा समावेश आहे. Employees Payment
सूत्रांच्या माहितीनुसार, ऑनशोर (विदेशात काम करणारे) कर्मचाऱ्यांना 2% ते 4%, तर ऑफशोर (भारतातील) कर्मचाऱ्यांना 6% ते 8% पगारवाढ मिळू शकते. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्याहून जास्त वाढ मिळण्याची शक्यता आहे.
याचवेळी, टीसीएसने 12 हजार मिड-लेव्हल ते सिनिअर लेव्हल कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे, जे कंपनीच्या जागतिक कर्मचार्यांच्या सुमारे 2 टक्के आहेत. कंपनीच्या मते, हा निर्णय “भविष्याच्या गरजांनुसार संघटनात्मक पुनर्रचना” करण्याचा एक भाग आहे. Employees Payment
टीसीएस चे एचआर हेड मिलिंद लक्कड आणि एचआर डिझिग्नेट के. सुदीप यांनी दिलेल्या संदेशात सांगितले की, “ही पगारवाढ म्हणजे आमच्या टॅलेंटला रिवॉर्ड देणे आणि टिकवून ठेवण्याचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर, कंपनी एआय, नवीन तंत्रज्ञान आणि मार्केट विस्तार यावर गुंतवणूक करत आहे.”
थोडक्यात – एका बाजूला मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची कपात केली जात असली, तरी दुसऱ्या बाजूला जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना पगारवाढ देऊन कंपनीने सकारात्मक संदेश दिला आहे.