Government Employees DA Hike 2026 : केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी जानेवारी 2026 मधील महागाई भत्ता (Dearness Allowance – DA) वाढीबाबत महत्त्वाची माहिती समोर येत आहे. ही महागाई भत्ता वाढ जुलै 2025 ते डिसेंबर 2025 या कालावधीतील ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक (AICPI) च्या आधारे निश्चित केली जाणार आहे.
निर्देशांकात मोठा बदल नाही
जुलै 2025 पासून आतापर्यंत (ऑक्टोबर 2025 पर्यंत) उपलब्ध असलेल्या AICPI आकडेवारीचा विचार करता, ग्राहक निर्देशांकात फारसा मोठा बदल दिसून येत नाही. निर्देशांकात किरकोळ चढ-उतार होत असल्याने महागाई भत्ता वाढ मर्यादित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
फक्त 2 टक्के DA वाढ होण्याची शक्यता. Government Employees DA Hike 2026
Financial Express च्या वृत्तानुसार, जानेवारी 2026 मध्ये केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात केवळ 2 टक्क्यांची वाढ होऊ शकते. विशेष म्हणजे, ही वाढ सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतरची सर्वात कमी DA वाढ मानली जात आहे.
सातवा वेतन आयोगातील सर्वात कमी वाढ
याआधी जानेवारी 2025 मध्येही कर्मचाऱ्यांना केवळ 2% महागाई भत्ता वाढ मिळाली होती. त्यामुळे सातवा वेतन आयोग (7th Pay Commission) अंतर्गत जानेवारी 2025 आणि जानेवारी 2026 या दोन्ही वेळेस फक्त 2% DA वाढ मिळाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
किमान 900 रुपयांची वाढ अपेक्षित
जर महागाई भत्ता वाढ 2% इतकी निश्चित झाली, तर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात सरासरी किमान 900 रुपये मासिक वाढ होण्याची शक्यता आहे. ही वाढ मूळ वेतनावर आधारित असणार आहे.
अधिकृत घोषणा कधी होणार?
सदर महागाई भत्ता वाढीबाबतची अधिकृत घोषणा केंद्र सरकारकडून पुढील महिन्यात करण्यात येण्याची शक्यता आहे. अंतिम निर्णय जुलै ते डिसेंबर 2025 या कालावधीतील संपूर्ण AICPI आकडेवारीनंतर जाहीर केला जाणार आहे.





