जुलैमध्ये महागाई भत्ता वाढणार? कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, DA होणार ५८% पर्यंत! DA Update News. 

जुलै पासूनचा महागाई भत्ता वाढणार? कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, DA होणार ५८% पर्यंत! DA Update News. 

DA Update News : केंद्र सरकारकडून कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी येण्याची शक्यता आहे. 7व्या वेतन आयोगाअंतर्गत लवकरच महागाई भत्ता (Dearness Allowance – DA) वाढवण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. जुलै 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार DA मध्ये वाढ जाहीर करू शकते. सध्या केंद्र सरकारचा DA दर 55 टक्क्यांवर आहे . आता पुढील टप्प्यात तो 58 टक्क्यांपर्यंत वाढवला जाण्याची शक्यता आहे.

वैयक्तिक कर्ज कधी घ्यावे? जाणून घ्या टॉप 5 कारणे आणि फायदे.

AICPI आकडे देत आहेत स्पष्ट संकेत

DA वाढीचा निर्णय AICPI (All India Consumer Price Index) च्या आकड्यांवर आधारित असतो. जानेवारी ते जून 2025 पर्यंतच्या आकड्यांच्या आधारे DA वाढवला जाईल. सध्या AICPI मधील सातत्याने होणारी वाढ पाहता, कर्मचाऱ्यांचा DA किमान 4 टक्क्यांनी वाढेल असे सांगितले जात आहे. यामुळे केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे उत्पन्न वाढणार आहे. DA Update News

See also  PPF, SSY, NSC, KVP वर किती व्याज मिळनार.? उद्या होणार निर्णय, जाणून घ्या. New Interest rate

DA मध्ये वाढ कधी जाहीर होईल? DA Update News

नेहमीप्रमाणे, सरकार दर सहा महिन्यांनी DA मध्ये सुधारणा करते. जानेवारी आणि जुलैमध्ये DA वाढीची घोषणा केली जाते. यापूर्वी मार्च 2025 मध्ये केंद्र सरकारने DA 4 टक्क्यांनी वाढवून 50 टक्क्यांवर नेला होता. आता जुलैमध्ये पुन्हा एकदा 4 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे.

वाढलेला DA कधीपासून लागू होईल? DA Update News

DA वाढीची अधिकृत घोषणा केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर होईल. ही घोषणा जुलैच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. वाढलेला DA जुलै 2025 पासून लागू होईल आणि त्याचे एरियरही कर्मचाऱ्यांना मिळेल.

MHADA लॉटरी 2025 : 5,285 घरांसाठी लॉटरी जाहीर; अर्ज कधीपासून सुरू हे जाणून घ्या!. Mhada Lotery 2025

किती मिळेल फायदा? DA Update News

जर DA 58 टक्क्यांपर्यंत वाढला, तर याचा थेट फायदा लाखो केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आणि निवृत्त व्यक्तींना मिळेल. यामुळे त्यांच्या महागाई भत्त्यात वाढ होऊन निव्वळ वेतनात चांगली वाढ होईल.

See also  Indian Employees in the US Face Uncertainty Amid H-1B Visa Policy Changes

Leave a Comment