दिवाळीच्या आधी सरकारी कर्मचाऱ्यांची ही प्रलंबित मागणी होणार पूर्ण! कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार ‘इतकी’ वाढ. DA Allowance News
दि 14 सप्टेंबर 2025, प्रतिनिधी.
DA Allowance News : केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. सातव्या वेतन आयोगाअंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी सरकार एक मोठा निर्णय घेऊ इच्छित आहे.
सरकार दिवाळीपूर्वीच काही निर्णय घ्यायला तयार आहे, ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात (पगारीभत्ता) मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. जुलै ते डिसेंबर या काळातील महागाई भत्त्याच्या (DA = Dearness Allowance) वाढीची घोषणा होण्याची अपेक्षा आहे.
सद्यस्थितीत कर्मचाऱ्यांना ५५% महागाई भत्ता मिळत आहे. पण आता सरकार ३ टक्क्यांनी वाढ करून हा दर ५८% करण्याचा प्रस्ताव करीत आहे. DA Allowance News
महागाई भत्ता दर दोनदा वाढवला जातो — पहिले जानेवारी ते जून आणि नंतर जुलै ते डिसेंबर काळासाठी. गेल्या मार्चमध्ये सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता २ टक्क्यांनी वाढवला होता, आणि तो वाढ जानेवारीपासून लागू करण्यात आली होती.
पगारात किती वाढ होणार? DA Allowance News
उदाहरणार्थ, जर एखाद्या कर्मचाऱ्याचा बेसिक पगार ₹१८,००० आहे, तर ५५% DA च्या दराने त्याला ₹९,९०० महागाई भत्ता मिळतोय. पण हा दर ५८% झाला तर महागाई भत्ता ₹१०,४४० होईल. म्हणजे पगारात ₹५४० वाढ होणार आहे.
पेन्शनधारकांसाठी: जर पेन्शन ₹९,००० आहे, तर सध्याच्या ५५% दराने महागाई भत्ता ₹४,९५० मिळतो. DA वाढून ५८% झाला तर भत्ता ₹५,२२० होईल, म्हणजे आणखी ₹२७० दरमहा जास्त मिळणार.
सरकारने हा बदल दिवाळीपूर्वी घोषणा करावी अशी अपेक्षा आहे. तसेच, या वाढीचा परिणाम जुलै महिन्यापासून लागू करण्यात येणार आहे, म्हणजे कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना पूर्वीच्या काळातील फरकाच्या रक्कमेचा भाता दिला जाईल.
DA Allowance News