आज बँका बंद राहणार का, 8 सप्टेंबरला ईद-ए-मिलादची सार्वजनिक सुट्टी. जाणुन घ्या. Bank Holiday news
फक्त मुंबई आणि उपनगरांसाठी लागू. Bank Holiday
हा निर्णय फक्त मुंबई शहर आणि उपनगरांपुरताच मर्यादित आहे. त्यामुळे मुंबईतील सर्व बँका, शाळा आणि महाविद्यालये आज, सोमवार 8 सप्टेंबरला बंद राहणार आहेत. मात्र, मुंबईत असलेले स्टॉक मार्केट सुरू राहील, कारण वार्षिक सुट्ट्यांच्या यादीत ईद-ए-मिलादचा समावेश केलेला नाही.
बँका आणि व्यवहारांवर परिणाम. Bank Holiday
शासनाने ही सुट्टी निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्ट, 1881 च्या कलम 25 नुसार जाहीर केली आहे. यामुळे आधी निश्चित केलेली 5 सप्टेंबरची सुट्टी रद्द करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेनुसार, सोमवार 8 सप्टेंबर रोजी सरकारी रोखे, परकीय चलन, मनी मार्केट आणि रुपया व्याजदर डेरिव्हेटिव्ह्जमध्ये कोणताही व्यवहार किंवा सेटलमेंट होणार नाही.
सर्व प्रलंबित व्यवहारांचे सेटलमेंट आता मंगळवार, 9 सप्टेंबर 2025 रोजी होणार आहे. त्याचप्रमाणे, 4 सप्टेंबरला झालेल्या भारत सरकारच्या रोख्यांच्या लिलावाचे सेटलमेंटही मंगळवारीच पार पडेल.
Bank Holiday news