अनुकंपा भरतीबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय, १० हजार जागांची भरती होणार. Anukampa Bharati 2025
सरकारच्या या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना आणि त्यांच्या कुटुंबियांना दिलासा मिळणार आहे. ही भरती जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली १५ सप्टेंबरपर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
एकाचवेळी सर्वात मोठी भरती. Anukampa Bharati 2025.
विशेष बाब म्हणजे, राज्यात पहिल्यांदाच एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणावर अनुकंपा भरती केली जात आहे. त्यामुळे ही भरती महाराष्ट्रातील अनुकंपा भरतीच्या इतिहासातील सर्वात मोठी भरती ठरणार आहे. या भरतीत महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांतील एकूण ९,५६८ जागांचा समावेश असून त्या थेट शासकीय व्यवस्थेतून भरण्यात येणार आहेत.
यापूर्वी चतुर्थ श्रेणीतील पदे बहुतांशी खाजगी कंत्राटदारांमार्फत भरली जात होती. मात्र आता सरकारने थेट अनुकंपा तत्वावरील रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेतल्याने पारदर्शकतेला चालना मिळणार आहे.
कुठे किती उमेदवार प्रतीक्षेत? Anukampa Bharati 2025
- महानगरपालिका – ५,२२८.
- जिल्हा परिषद – ३,७०५.
- नगरपालिका – ७२५.
जिल्हानिहाय पाहता, नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक ५०६ उमेदवार प्रतीक्षेत आहेत. त्यानंतर पुणे (३४८), गडचिरोली (३२२) आणि नागपूर (३२०) या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो.
अनुकंपा धोरण काय आहे? Anukampa Bharati 2025
राज्यातील शासकीय किंवा निमशासकीय सेवेत असताना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास, त्यांच्या कुटुंबातील पात्र वारसाला नोकरी देण्याची तरतूद १९७३ पासून अस्तित्वात आहे. हे धोरण प्रामुख्याने गट-क आणि गट-ड पदांसाठी लागू आहे.