राज्यातून या ठिकाणाहून पंढरपूरसाठी 65 एसटी विशेष बस सेवा सुरू. Aashadhi Ekadashi 2025 

राज्यातून या ठिकाणाहून पंढरपूरसाठी 65 एसटी विशेष बस सेवा सुरू. Aashadhi Ekadashi 2025 

नागपूर | प्रतिनिधी, दि. 21 जुन 2025.

Aashadhi Ekadashi 2025 : यंदाच्या आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) नागपूर विभागातून पंढरपूरसाठी ६५ विशेष एसटी बस सेवा उपलब्ध करून दिली आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी ही मोठी सुविधा ठरणार आहे.

या विशेष बस सेवा २ जुलै ते १३ जुलै २०२५ या कालावधीत चालवण्यात येणार आहेत. मागील वर्षी फक्त ४० बसेस होत्या, परंतु यावर्षी भाविकांच्या वाढलेल्या गर्दीचा विचार करून बसेसची संख्या ६५ वर नेण्यात आली आहे.

🚍 कुठून किती बसेस धावणार?

नागपूर विभागातील विविध आगारांमधून पुढीलप्रमाणे बसेस सोडण्यात येणार आहेत:

  1. घाटरोड आगार – 13 बसेस.
  2. गणेशपेठ आगार – 13 बसेस.
  3. उमरेड आगार – 5 बसेस
  4. काटोल आगार – 7 बसेस
  5. रामटेक आगार – 7 बसेस
  6. सावनेर आगार – 7 बसेस
  7. इमामवाडा आगार – 6 बसेस
  8. वर्धमाननगर आगार – 7 बसेस
See also  जुनी पेन्शन योजनेबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन,  कर्मचाऱ्यांची मागणी पुन्हा जोरात . Maharashtra government pension news

यामुळे संपूर्ण नागपूर जिल्ह्यातून पंढरपूरसाठी सहज प्रवास करता येणार आहे. Aashadhi Ekadashi 2025

जालना–तिरुपती विशेष ट्रेन सेवा 7 जुलैपासून सुरू; या भागातुन धावणार भाविकांसाठी दिलासादायक निर्णय. Jalna Tirupati Special Train

💬 MSRTC चे म्हणणे काय?

महामंडळाचे अधिकाऱ्यांनी सांगितले की, “भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी आणि खासगी प्रवास कंपन्यांच्या वाढीव भाड्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ही विशेष सेवा सुरू करण्यात आली आहे. गरज भासल्यास आणखी बसेस वाढवण्याची तयारीही आहे.”

🙏 भाविकांसाठी सुविधा. Aashadhi Ekadashi 2025

  • प्रवासासाठी तिकिटांचे आरक्षण स्थानिक एसटी आगारांमध्ये उपलब्ध आहे.
  • सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक बसमध्ये कर्मचारी आणि आवश्यक उपाययोजना असतील.
  • प्रवास वेळा आणि मार्गांची माहिती संबंधित आगारात किंवा MSRTC वेबसाइटवर मिळू शकते.
  • राज्यभरात पंढरपूरसाठी 5200 विशेष बसेस
See also  पेन्शन किती मिळणार, पहा काय असणार लिमिट. Epfo pension increase

संपूर्ण महाराष्ट्रातून येणाऱ्या वारकऱ्यांसाठी MSRTC ने ५२०० विशेष बसेस तैनात केल्या आहेत. या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यातून पंढरपूरला थेट सेवा पुरवली जाणार आहे.

Jio ने सादर केला 56 दिवसांचा नवा रिचार्ज प्लान – जाणून घ्या सर्व फायदे आणि किंमत. Jio 56 Days Recharge Plan

Leave a Comment