Close Visit Mhshetkari

आपल्या मुलासाठी लाखोंचा फंड तयार करण्याची संधी. NPS Watsalya Yojana.

NPS वत्सल्य योजना: आपल्या मुलासाठी लाखोंचा फंड तयार करण्याची संधी. NPS Watsalya Yojana.

NPS Watsalya Yojana : आपल्या मुलाचे भवितव्य सुरक्षित करणे प्रत्येक पालकासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. शिक्षण, करिअर, लग्न यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च येतो, आणि यासाठी आर्थिक नियोजन आधीपासूनच केलेले असावे लागते. राष्ट्रीय निवृत्ती योजना (NPS) अंतर्गत ‘वत्सल्य योजना’ ही अशीच एक योजना आहे जी आपल्या मुलाच्या नावावर मोठा फंड तयार करू शकते. जर योग्य पद्धतीने गुंतवणूक केली, तर 18 वर्षांत तब्बल 11 कोटी रुपयांचा फंड तयार होऊ शकतो.

वात्सल्य योजना म्हणजे काय? NPS Watsalya Yojana

NPS वत्सल्य योजना ही मुलांच्या भविष्याचा विचार करून खास तयार करण्यात आली आहे. ही योजना पालक त्यांच्या मुलांच्या नावावर सुरू करू शकतात. यात दीर्घकालीन गुंतवणुकीचा फायदा मिळतो आणि बाजाराशी निगडीत परताव्यामुळे भरघोस रक्कम निर्माण होते.

See also  आता कर्मचारी घाबरणार नाही! नवीन कायद्यात असे काय आहे. जाणून घ्या. Employee new news

11 कोटींचा फंड कसा तयार होतो? NPS Watsalya Yojana

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जर एखाद्या पालकाने आपल्या 6 महिन्यांच्या बाळासाठी दरमहा ₹50,000 NPS वत्सल्य योजनेत गुंतवले, आणि ही गुंतवणूक मुलाच्या 18 व्या वर्षापर्यंत सुरू ठेवली, तर दरवर्षी सरासरी 12% परतावा गृहीत धरून सुमारे 11.27 कोटी रुपयांचा फंड तयार होऊ शकतो.

  1. महत्त्वाचे घटक: NPS WatsalyaYojana
  2. गुंतवणुकीची रक्कम: ₹50,000 प्रति महिना.
  3. गुंतवणुकीचा कालावधी: 18 वर्ष.
  4. एकूण गुंतवणूक: ₹1.08 कोटी.
  5. अंदाजे परतावा (12%): ₹10.19 कोटी.
  6. एकूण फंड: ₹11.27 कोटी

NPS वत्सल्य योजनेची वैशिष्ट्ये:

1. सुरक्षित आणि पारदर्शक योजना: ही योजना सरकारच्या देखरेखीखाली चालते, त्यामुळे गुंतवणूक सुरक्षित मानली जाते.

2. बाजाराशी निगडीत परतावा: इथे गुंतवणूक शेअर बाजाराशी निगडीत असते, त्यामुळे इतर पारंपरिक योजनांपेक्षा अधिक परतावा मिळण्याची शक्यता असते.

See also  आता PF रक्कम UPI व ATM द्वारे थेट काढता येणार; EPFO 3.0 अंतर्गत मोठा बदल. PF Provident Fund.

3. टॅक्स फायदे: IT कायद्याच्या कलम 80CCD अंतर्गत करसवलत मिळते.

4. मुलाच्या भविष्यासाठी: शिक्षण, व्यवसाय किंवा लग्नासाठी मोठा फंड तयार होतो.

5. ऑटो व मॅन्युअल मोड उपलब्ध: गुंतवणुकीचे व्यवस्थापन आपण निवडू शकता.

गुंतवणूक करताना लक्षात ठेवाव्या काही गोष्टी:

  • वत्सल्य योजना ही लांब पल्ल्याची योजना आहे, त्यामुळे संयम आवश्यक.
  • बाजारातील चढ-उतारांचा परिणाम परताव्यावर होतो.
  • वेळोवेळी आपल्या गुंतवणुकीचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे.
  • गुंतवणूक करताना आपल्या उत्पन्नानुसार मासिक रक्कम ठरवा.

ही योजना कोणी सुरू करू शकते?

भारतात राहणारे 0 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोणताही पालक ही योजना सुरू करू शकतो. NPS Watsalya Yojana

पालक ही योजना स्वतःच्या नावावर चालवत मुलाचा नामनिर्देश (Nominee) करू शकतात, किंवा थेट मुलाच्या नावावर NPS खाता उघडू शकतात.

See also  घर किंवा प्लॉट खरेदी करताना फक्त ही कागदपत्रे तपासा, फसवणूक टाळा आणि पैसे वाचवा. Real Estate Fraud Prevention

निष्कर्ष:

जर तुम्ही तुमच्या मुलाचे भवितव्य आर्थिकदृष्ट्या भक्कम करायचे ठरवले असेल, तर NPS वत्सल्य योजना एक उत्तम पर्याय ठरू शकतो. नियमित गुंतवणूक व संयम ठेवल्यास तुम्ही तुमच्या मुलासाठी कोट्यवधींचा फंड तयार करू शकता. यामधून तुमच्या मुलाचे शिक्षण, व्यवसाय, लग्न यासाठी पैशाची चिंता कमी होईल आणि आत्मविश्वास वाढेल.

Leave a Comment