उजनी येथे बकरी ईद साजरी; शांततेत पार पडला सण.

अंबाजोगाई | प्रतिनिधी – दिनांक : ७ जून 

अंबाजोगाई तालुक्यातील उजनी गावात बकरी ईदचा म्हणजेच ईद- अल -अधा चा सण शांततेत आणि आनंदात साजरा झाला. सकाळी गावातील मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन ईदगाहवर नमाज अदा केली .

त्यानंतर सामूहिक दुवा पठण करण्यात आली, देशामध्ये शांतता आणि सलोखा कायम रहावा तसेच भारतातील देश सेवेत शाहिद झालेल्या बांधवासाठी दुआ करण्यात आली नमाजीनंतर एकमेकांना शुभेच्छा देत सण साजरा करण्यात आला.

सणानिमित्त घरोघरी विशेष स्वयंपाक करण्यात आला होता. बिर्याणी, शेवई आणि इतर पारंपरिक खाद्यपदार्थांची रेलचेल होती. लहान मुले नवीन कपडे घालून आनंदात होती,  रंगीबेरंगी वेशभूषा परिधान करून सणाची शोभा वाढवली.

गावात सर्व काही शांततेत पार पडले. कोणताही गोंधळ किंवा अडथळा न होता दिवस आनंदात गेला. सर्व गावकऱ्यांनी एकमेकांना शुभेच्छा देत बकरी ईद साजरी केली.

See also  NPS वत्सल्य योजना: आपल्या मुलासाठी लाखोंचा फंड तयार करण्याची संधी. NPS Watsalya Yojana.

उजनी गावात बकरी ईद साधेपणाने आणि सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडली. 

Leave a Comment