Created by Irfan, Date- 15 जुन 2025
आषाढी वारीसाठी एसटी महामंडळाचे मोठे पाऊल; २००० नवीन बसगाड्यांची भर. MSRTC news Update.
MSRTC News Update : नमस्कार मित्रानो पंढरपूरकडे होणाऱ्या आषाढी वारी यात्रेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी)ने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तब्बल ९ वर्षांनंतर एसटीच्या ताफ्यात २,००० नवीन “लालपरी” बसगाड्यांची भर पडणार असून, भाविकांच्या प्रवासाला अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित करण्यासाठी ही बसगाड्या उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
पुणे विभागासाठी विशेषतः ६५ नवीन बसगाड्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत राज्यभरात १,५०० नवीन बसगाड्या कार्यान्वित करण्यात आल्या असून, पुढील एक महिन्यात आणखी १,००० बसगाड्या ताफ्यात सामील होणार आहेत. त्यामुळे भाविकांना त्यांच्या वारी प्रवासात अधिक चांगल्या सुविधा मिळणार आहेत. MSRTC News Update
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील वारी संदर्भात विविध उपाययोजना जाहीर केल्या आहेत. यात भाविकांसाठी गट विमा योजना, वैद्यकीय सेवा, कार्डियाक अॅम्ब्युलन्स, पंढरपूर येथे तात्पुरती आयसीयू सुविधा अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे. MSRTC News Update
याशिवाय, अलीकडील पावसामुळे खराब झालेल्या मार्गांची दुरुस्ती, वीज व पाण्याची उपलब्धता, तसेच विश्रांतीस्थळी पाणproof तंबू उभारण्याचे निर्देशही दिले गेले आहेत.
सरकारच्या या निर्णयामुळे लाखो वारकऱ्यांचा प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि आरामदायक होणार आहे.