Close Visit Mhshetkari

31 डिसेंबरपासुन निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; काल्पनिक वेतनवाढीवर पेन्शन निश्चित होणार. Maharashtra Government Employees Pension

31 डिसेंबरला निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; काल्पनिक वेतनवाढीवर पेन्शन निश्चित होणार. Maharashtra Government Employees Pension

मुंबई : Maharashtra Government Employees Pension  : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा दिलासादायक निर्णय वित्त विभागाने घेतला आहे. काल्पनिक वेतनवाढ (Notional Increment) विचारात घेऊन निवृत्तीवेतन निश्चित करण्याबाबत वित्त विभागाने 19 डिसेंबर 2025 रोजी महत्त्वाचा शासन निर्णय जारी केला आहे.

या शासन निर्णयानुसार, यापूर्वी 30 जून रोजी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना 1 जुलैची काल्पनिक वेतनवाढ देण्यात येत होती. हा निर्णय 29 जून 2023 रोजीच्या वित्त विभागाच्या शासन परिपत्रकानुसार लागू करण्यात आला होता.

आता याच धर्तीवर 31 डिसेंबर रोजी निवृत्त होणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांना 1 जानेवारीची काल्पनिक वेतनवाढ मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांचे वेतन आणि त्यावर आधारित निवृत्तीवेतन वाढणार आहे.

See also  रेशन कार्ड ekyc अशी करा अन्यथा, रेशन होईल बंद. Ration Ekyc Update

वित्त विभागाच्या 28 जून 2023 रोजीच्या शासन परिपत्रकातील सर्व सूचनांचा लाभ 31 डिसेंबर रोजी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सर्व प्रशासकीय विभागांनी या सूचनांनुसार तात्काळ कार्यवाही करावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. Maharashtra Government Employees Pension

सातव्या वेतन आयोगानुसार 1 जानेवारी रोजी वार्षिक वेतनवाढ देण्याची तरतूद 1 जानेवारी 2016 पासून लागू असल्याने, केंद्र सरकारच्या धर्तीवर ही सुविधा राज्य कर्मचाऱ्यांनाही 1 जानेवारी 2016 पासून लागू करण्यात आली आहे.
या निर्णयामुळे 31 डिसेंबर रोजी निवृत्त होणाऱ्या हजारो राज्य कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार असून त्यांच्या पेन्शनमध्ये वाढ होणार आहे.

Leave a Comment