राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी –या पॅसेंजर ट्रेन पुन्हा सुरू होण्याची शक्यता, प्रवाशांमध्ये आनंदाचा माहोल. Maharashtra Railway Update

भुसावळ–मुंबई पॅसेंजर ट्रेन पुन्हा सुरू होण्याची शक्यता, प्रवाशांमध्ये आनंदाचा माहोल. Maharashtra Railway Update

मुंबई : Maharashtra Railway Update : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी असलेल्या मुंबईतील लाखो प्रवाशांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. अनेक महिन्यांपासून रद्द असलेली भुसावळ–मुंबई पॅसेंजर ट्रेन पुन्हा सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे उत्तर महाराष्ट्रातून मुंबईकडे होणारा प्रवास अधिक सुलभ आणि स्वस्त होण्याची अपेक्षा आहे.

कोरोना काळानंतर सेवा बंद – प्रवाशांचे हाल सुरूच

मध्य रेल्वेमार्गावर चालणारी भुसावळ–मुंबई पॅसेंजर ट्रेन कोरोना काळात रद्द करण्यात आली. तेव्हापासून कोरोना काळानंतरही ही सेवा पुन्हा सुरू करण्यात आलेली नाही.

यामुळे लहान स्थानकांवरून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठ्या स्थानकांवर जाणे भाग पडत आहे. एक्स्प्रेस गाड्या आधीच खच्चून भरलेल्या असल्याने प्रवाशांना ६ ते ७ तास उभ्याने प्रवास करण्याची वेळ येत आहे.

See also  कर्मचाऱ्यांचे स्वप्न होणार पूर्ण, सरकारची नवीन योजना. Employees new scheme

लहान स्थानकांवरील प्रवाशांची अडचण कायम

भुसावळ–मुंबई मार्गावर लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांची संख्या जरी वाढली असली तरी त्या गाड्या बहुतांश वेळा लहान स्थानकांवर थांबत नाहीत.
भुसावळ – जळगाव – नांदगाव – मनमाड – निफाड – लासलगाव – इगतपुरी – कसारा अशा अनेक स्टेशनवरील प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.

पूर्वीची पॅसेंजर गाडी – प्रवाशांची खरी जीवनवाहिनी. Maharashtra Railway Update

कोरोनापूर्वी भुसावळ–सीएसएमटी दरम्यान 51153/51154 पॅसेंजर ट्रेन धावत होती.

  1. भुसावळ प्रस्थान : सकाळी 7.05.
  2. थांबे : तब्बल 47 स्टेशन
  3. वेग : 37 किमी प्रतितास
  4. मुंबई पोहोचण्याचा वेळ : सुमारे 12 तास
  5. प्रवास खर्च : ७० ते ८० रुपये

स्वस्त तिकिटे आणि प्रत्येक स्टेशनवर थांबा, या दोन कारणांमुळे साधारण प्रवाशांसाठी ही ट्रेन जीवनवाहिनी ठरली होती.

See also  Understanding the $1,400 New Year's Day Stimulus, Assistance for Low-Income and Senior Citizens

जळगाव–मनमाड तिसऱ्या मार्गानंतर मागणी पुन्हा वाढली. 

अलीकडेच जळगाव–मनमाड तिसऱ्या मार्गाची चाचणी पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरील प्रवाशांचा आत्मविश्वास वाढला आहे. स्थानिक नागरिक आणि विविध संघटनांनी पुन्हा एकदा पॅसेंजर किंवा मेमू गाडी सुरू करण्याची मागणी वेगाने पुढे नेली आहे.

रेल्वे प्रशासनाचा सकारात्मक निर्णय अपेक्षित. Maharashtra Railway Update

लहान स्थानकांवरील विद्यार्थ्यांपासून ते कामगारांपर्यंत सर्वच प्रवाशांना या पॅसेंजर ट्रेनची पुन्हा सुरुवात अत्यावश्यक वाटते आहे.
रेल्वे प्रशासन लवकरच सकारात्मक निर्णय घेईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment