📅 ०८ डिसेंबर २०२५ | नागपूर Public Transport News Maharashtra : हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस स्थगित झाल्यानंतर आज परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी नागपूरच्या गणेशपेठ एसटी बसस्थानकाला अचानक भेट देऊन सुविधा तपासल्या. या अचानक तपासणीमुळे बसस्थानकातील कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली.
🔍 कोण-कोणत्या सुविधा तपासल्या?
मंत्री सरनाईक यांनी प्रसाधनगृह, उपहारगृह, प्रवासी प्रतीक्षालय, चौकशी कक्ष, चालक-वाहक विश्रांतीगृह यांसह सर्व महत्त्वाच्या विभागांची पाहणी केली. चालक व वाहकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. गरम पाण्याची उपलब्धता सुधारल्याबद्दल चालक-वाहकांनी समाधान व्यक्त केले.
📌 “३६५ दिवस सुविधा मिळाल्या पाहिजेत, दिखावा नको!”
अधिवेशन नागपूरमध्ये असल्याने केवळ दौऱ्याच्या निमित्ताने सजावट न करता, वर्षभर प्रवाशांना मूलभूत सुविधा मिळतील याची काळजी घ्या, असे सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले.
👩🦰 हिरकणी कक्षाची तपासणी
महिला प्रवाशांसाठी असलेल्या हिरकणी कक्षाची पाहणी करताना काही सुधारणा आवश्यक असल्याचे दिसून आले. त्यामुळे कक्ष अद्ययावत करून तिथे महिला कर्मचारी नियुक्त करण्याचे आदेश देण्यात आले.
🚻 स्वच्छता समाधानकारक, पण उपहारगृहावर नाराजी
शौचालये व इतर सुविधा सुमारे ९०% समाधानकारक आढळल्या
मात्र उपहारगृहात गंभीर अस्वच्छता आणि दुर्गंधी असल्याचे आढळले
यावर तत्काळ कारवाई करत उपहारगृहाचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले.
👥 विद्यार्थी आणि प्रवाशांशी संवाद
NCC कॅडेट्स आणि प्रवाशांशी संवाद साधून त्यांचे अभिप्राय व सूचना जाणून घेण्यात आल्या.
नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू असताना अशा अचानक तपासण्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.